कर्जत - दि.23 

           विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 चा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे, 189 कर्जत-खालापूर विधानसभा मतदार संघातील निवडणूक कार्यक्रम प्रक्रिये संबंधी माहिती देण्यासाठी उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली परदेशी - ठाकूर यांनी राजकीय पक्षाची बैठक बोलवली होती.

              उपविभागीय अधिकारी यांच्या दालनात झालेल्या बैठकीस तहसीलदार विक्रम देशमुख, कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल घेरडीकर, खालापूर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रणजित पाटील, नायब तहसीलदार संजय भालेराव, राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष दत्ताजी मसुरकर, तानाजी चव्हाण, तालुका अध्यक्ष अशोक ओसवाल, शरद लाड,आरपीआय तालुका अध्यक्ष राहुल डाळींबकर, भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष पंढरीनाथ राऊत, राजेश भगत, कॉग्रेस चे तालुका अध्यक्ष मुकेश सुर्वे, कम्युनिस्ट पक्षाचे नेते वकील गोपाळ शेळके, जनहित लोकशाही पार्टीचे रमेश कदम आदी उपस्थित होते.

               निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली परदेशी -ठाकूर यांनी निवडणूक आयोगाच्या आदेशाने निवडणूक कार्यक्रम कसा पार पाडला जाणार आहे ते सांगितले, निवडणूक कार्यक्रमा अंतर्गत आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करायची आहे असे सांगून मतदानाच्या टक्केवारीत वाढ करायची आहे त्यासाठी सर्वांनीच सहकार्य करावे असे सांगितले.

             यावेळी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काही सूचना मांडल्या तर काही प्रश्न उपस्थित केले त्यांना निवडणूक निर्णय अधिकारी परदेशी -ठाकूर यांनी समाधान कारक उत्तरे देत आपल्याल्या निवडणूक आयोगाने जे नियम घालून दिले आहेत त्याप्रमाणेच काम करावे लागेल असे सांगितले. उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल घेरडीकर आणि डॉ. रणजित पाटील यांनीही काही सूचना दिल्या.

अवश्य वाचा