मुरुड जंजिरा  

     जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक जिल्हा रुग्णालय अलिबाग, आयसिटीसी विभाग, ग्रामीण रुग्णालय मुरुड, महा लॅब अलिबाग व ग्रामपंचायत चेहेर यांच्या संयुक्त विद्यमाने  चेहेर येथील ग्रामस्थांसाठी सर्व रोग निदान रक्त तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरांमध्ये एच आय व्ही, सीबीसी, थायरॉईड, कॅल्शिअम कावीळ अशा विविध प्रकारच्या रक्त तपासण्या करण्यात आल्या. या शिबिराचे उदघाटन येथील सरपंच सुवर्णा सुशिल चवरकर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ग्रामपंचायत सदस्य निकिता नितीन चवरकर,अनिता गणेश रोटकर, तसेच सुशिल दत्तात्रय चवरकर उपस्थित होते. प्रथमतः लोकांना ग्रामीण रुग्णालय मुरुड चे  सचिन जाधव यांनी एच आय व्ही एड्स तसेच सीबीसी थायरॉईड तपासणी बद्दल अतिशय महत्त्वाची माहिती दिली. यावेळी आयसिटीसी विभाग,ग्रामीण रुग्णालय मुरुड येथील सचिन जाधव, समीर धांडुरे,महालॅब अलिबाग येथील मनिषा वर्तक,चेहेर उपकेंद्र येथील आरोग्य सेविका शिल्पा ठाकूर,आरोग्य सेवक गणेश जैतु, आशा वर्कर आशा माळी आदी उपस्थित होते.

यावेळी येथील ९८  लोकांची वरील प्रमाणे रक्ततपासणी करण्यात आली. या शिबिरात चेहेर गावातील सर्व पाच बचत गटांनी सहभाग नोंदवून लक्षणीय उपस्थिती दर्शविली. सदर शिबिरात रक्त तपासणी करून घेण्यासाठी महिलांनी उत्स्फूर्तपणे मोठा सहभाग घेतला. पावसाळ्यात विविध प्रकारचे आजार, पेशी कमी होणे, डेंग्यू सदृश्य आजार तसेच जीवघेणा एच आय व्ही एड्स आजार नियंत्रणात आणायचे झाल्यास रक्त तपासणी करून घेणे खूप महत्त्वाचे असल्याचे या वेळी सचिन जाधव यांनी सांगितले. हे शिबीर यशस्वी होण्यासाठी गावातील सुशील चवरकर,उपकेंद्र चेहेर चे शिल्पा ठाकूर, गणेश जैतु आशा माळी सचिन जाधव यांनी परिश्रम घेतले.

जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक जिल्हा रुग्णालय अलिबाग, आयसिटीसी विभाग, ग्रामीण रुग्णालय मुरुड, महा लॅब अलिबाग व ग्रामपंचायत चेहेर यांच्या  संयुक्त विद्यमाने  चेहेर येथील ग्रामस्थांसाठी सर्व रोग निदान रक्त तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते यावेळी रुग्णांची तपासणी करताना संबंधित डॉक्टर दिसत आहेत.

अवश्य वाचा