चिपळूण 

 सहयाद्री शिक्षण संस्था व रुद्र अकॅडमी यांच्या संयुक्त नियोजनातून सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या चिपळूण , संगमेश्वर,गुहागर तालुक्यातील विविध गावातून येणाऱ्या युवकांना महाराष्ट्र पोलिस  सेवेत भरती होण्यासाठी आवश्यक असणारे मार्गदर्शन  त्याच सोबत प्रशिक्षणासाठी लागणारे साहित्य, पुस्तके ,मैदान, लेक्चर हॉल आणि राहण्याची सुविधा अशा उपयुक्त बाबी संस्थेचे कार्याध्यक्ष मा.श्री. शेखर निकम यांच्या  माध्यामातून उपलब्ध करण्यात येणार आहे. आपल्या मतदार संघातील तरुण सुशिक्षित होवून वेगवेगळ्या सरकारी नोकऱ्यामध्ये रुजू झाला पाहिजे आणि त्यासाठी गरजेचे असणारे , शैक्षणिक व मैदानी प्रशिक्षण या मुलांपर्यंत पोहचली पाहिजे या ध्यासाने शेखर सर यांनी  प्रशिक्षण वर्ग सावर्डे येथे चालू केले आहे नक्कीच येणाऱ्या काळात सावर्डे हे एक स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र म्हणून संपूर्ण जिल्हयात नक्कीच ओळखले जाईल.

 

अवश्य वाचा