खेड 

भारतीय मराठा महासंघ गुजरात राज्य संपर्क प्रमुख व कोकण प्रदेशाध्यक्ष सदानंद राव भोसले यांचे हस्ते सुरत येथील विद्यकुंज स्कुल पालन पूर येथे शेकडो समाज बांधव उपस्थित दक्षिण गुजरात प्रमुख पदी संजय उतेकर तर उप प्रमुख म्हणून सुनील पवार यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले या वेळी पाहुणे म्हणून रायगड जिल्हा अध्यक्ष दत्ताराम पवार व सुरत येथील समाज नेते हेमंत शिंदे उपस्थित होते.

या वेळी बोलताना भोसले म्हणाले मराठ्यांचा व सुरतेच्या संबंध अनेक शतकांपासून आहे आज येथे महाराजांनी उभारलेला किल्ला आहे खा. सी आर पाटील व समाज नेते दिवंगत बाबुराव शिंदे यांच्या सहकार्यातून उभा राहिलेला सहारा दरवाजा येथील शिवरायांचा भव्य पुतळा महाराजानी स्वराज स्थापन करण्यात सुरतेवर केलेली स्वारी अनेक शतकांपासून मराठ्यांचा पराक्रमाचा वारसा सध्या येथिल लोकप्रिय खासदार सी आर पाटील चालवत आहेत सर्व समाज बांधवांना एकत्र करून व सर्व धर्म समभाव राखून कार्य करीत आहेत एक पोलिस शिपाई कारकून म्हणून नोकरी सोडून राजकारणात सक्रीय सहभाग घेऊन हिंदुस्तानात सर्वधिक मताधिक्याने विजयी होण्याचा मान मिळवतो ते ही दक्षिण गुजरात मधून हा डौलाने भगवा फडकवला जातो याचा आम्हा सार्थ अभिमान वाटतो असे गुजरात राज्य संपर्क प्रमुख सदानंद राव भोसले यांनी सांगितले.

  आज मी येथे पदाधिकारी यांच्या नियुक्त्या प्रदान करणे साठी आलो आहे दिवाळी नंतर येथे भारतीय मराठा महासंघ दक्षिण गुजरात वतीने मराठ्यांचा भव्य मेळावा राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर अप्पासाहेब आहेर यांच्या नेतृत्वाखाली व येथील लोकप्रिय खासदार लोकनेते मराठ्यांची शान श्री. सी आर पाटील यांच्या अध्यक्षेखाली संपन होणार आहे असे भारतीय मराठा महासंघ कोकण विभाग अध्यक्ष सदानंद राव भोसले यांनी सांगितले.

अवश्य वाचा