पाताळगंगा २१ सप्टेंबर

     पावसाने आहाकार केल्यामुळे तालुक्यातील असलेली भात शेती पाण्याखाली गेल्यामुळे शेतकरी वर्गांचे मोठे नुकसान झाले होते. मात्र झालेल्या भात शेतीचे तातडीने पंचनामे करण्यात यावे,यासाठी खालापुर येथिल तहसीलदार इरेश चप्पलवार यांना खालापूर शेतकरी संघटनेच्या माध्यमातून भात शेतीच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्यासाठी निवेदन देण्यात आले होते.तहसीलदार यांनी या निवेदनाची दखल घेवून संबंधित अधिकारी यांस तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले.तालुक्यातील लागवड खाली असणारी भात शेतीचे नुकसान होते त्यांचे रितसर पंचनामे करण्यात आले.

                ४ ऑगस्ट रोजी झालेल्या पावसाने मात्र कहर केला.असल्यामुळे भात शेतीचे मोठे नुकसान झाले.पाण्याचा प्रवाह ऐवढ्या तीव्रतेने होता की डोंगराळ भागातील माती शेतामध्ये आल्यामुळे भात शेती या मातीखाली गाडली गेली.त्याच बरोबर पावसाच्या पाण्याचा खूप तीव्रतेने असल्यामुळे शेतात केलेली लागवड पुर्ण पणे पाण्याच्या प्रवाहाने वाहून गेल्यामुळे शेतकरी पुर्ण हतबल झाले आहे.भात पेरणी पासून ते लागवड पर्यंत घेतलेल्या मेहनतीवर पाणी फिरल्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.

          मात्र तालुक्यातील शेतकरी वर्गांवर अन्याय होवू नये.त्याच बरोबर भात शेती हे कोकणातील मुख्य पिक असून त्याच्या वरती शेतकरी वर्गांच्या कुटुंब्यांचा उदार निर्वाह होत असतो.मात्र पावसाच्या तांडवामुळे शेती धोक्यात आल्यामुळे शेतकरी वर्गांवर आलेले अस्मानी संकट यामुळे शेतकरी खचला गेला होता.मात्र तालुक्यातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकरी संघटनांनी तहसीलदार यांना या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी निवेदन दिले आणी या निवेदनांची दखल घेवून तातडीने पंचनामे करण्यात आले.

अवश्य वाचा

रस्त्या केला गिळंकृत