ठाणे 

आधुनिक जीवनशैलीमध्ये किडनीच्या म्हणजेच मूत्रपिंडाच्या  समस्या लोकांमध्ये जलद वाढत आहे. मानवाच्या शरिरात दोन किडन्या असतात यापैकी एका किडनीचे जरी आरोग्य बिघडले तर त्याचा भार दुसऱ्या किडनीवर येतो. ज्या व्यक्तीमध्ये एकच किडनी असते अशा लोकांनी पाण्याचे सेवन जास्त करणे , वेदनाशामक औषधी न घेणे, नियमित रक्तदाबाची तपासणी व त्यावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे असते  कारण  जर किडनीमध्ये जर मुतखडा अथवा जंतुसंसर्ग झाला झाला तर अनेकवेळा गंभीर परिस्थिती निर्माण होते. जुईनगर येथे राहणारे श्री कांतीलाल तनेजा ( वय ७७) यांची पाच वर्षांपूर्वी जंतुसंसर्गामुळे एक किडनी काढण्यात आली होती  अशातच  गेल्या आठवड्यात मुतखडा झाल्याचे निदान झाले  व त्यांची लघवी बंद झाली. एकच किडनी असलेल्या नागरिकांमध्ये अशा समस्या अनेकवेळा आढळून येतात. कांतीलाल तनेजा यांना आपत्कालीन स्थितीमध्ये नवी मुंबई -नेरुळ येथील  तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मूत्रविकारतज्ञ डॉ निशांत काठाळे यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय उपचार सुरु करण्यात आले. याविषयी अधिक माहिती देताना मूत्रविकारतज्ञ डॉ निशांत काठाळे  म्हणाले, "कांतीलाल यांच्या शरीरात असलेल्या एकाच किडनीमध्ये १ सेन्टीमीटर मुतखडा व जंतुसंसर्ग झाल्यामुळे झाल्यामुळे त्या किडनीचे कार्य पूर्णपणे बंद झाले होते अशावेळी किडनीला कमी दुखापत करून हा मुतखडा काढणे म्हणजे डॉक्टरांसाठी एक वैद्यकीय आव्हान असते. कारण मुतखडा काढताना जर किडनीमधून रक्तस्राव झाला तर अशा रुग्णाला पुढील आयुष्य हे डायलासिसवर काढावे लागते त्यामुळे आम्ही मिनी पर्कुटेनियस नेफ्रोलिथोटोमी म्हणजेच अगदी छोटा होल करून  करून स्कोपीद्वारे हा मुतखडा काढून टाकला व पुढील २४ तासांमध्ये त्यांच्या किडनीचे आरोग्य पूर्ववत झाले. ही प्रक्रिया वेळेवर झाली नसती तर कदाचित त्याना डायलासिसची आवश्यकता भासली असती. रक्तस्त्राव न करता अथवा किडनीतील कोणतेही टिशु नष्ट न करता आम्ही ही वैद्यकीय प्रक्रिया तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये यशस्वीरीत्या पार पाडली." उच्च रक्तदाब, मधुमेह, कर्करोग, यकृताचा तीव्र आजार, मूत्रसंसर्ग, मूतखडा, संधिवात अशा आजारांच्या रुग्णांना किडनीचे आजार होण्याचा संभव अधिक असतो. त्यामुळे अशा रुग्णांनी त्यांच्या किडनीच्या कार्याबद्दल जागरूक राहणे आवश्यक आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसारभारतामध्ये दरवर्षी २ लाख डायलासिसचे रुग्ण वाढत असून किडनी फेल्युयर होण्याचे प्रमाणही वाढत आहे. 

अवश्य वाचा