खेड 

       रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने श्री.समर्थ कृपा विश्व प्रतिष्ठान वेरळ व खेड तालुका कबड्डी असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दि.२  ऑक्टोबर २०१९ रोजी वेरळ, ता.खेड येथे रत्नागिरी जिल्हा किशोर व किशोरी गट अजिंक्य पद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्यातील किशोर मुलांचे१८ संघ व किशोरी मुलींचे १४ संघ स्पर्धेत सहभागी होतील. सदर स्पर्धेतून राज्य अजिंक्य पद व निवड चाचणी स्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्ह्याचे मुलांचे दोन व मुलींचे दोन संघ निवडण्यात येणार आहेत.

           श्री.समर्थ कृपा विश्व प्रतिष्ठान वेरळ चे सन्मानिय अध्यक्ष श्री.सुयश पाष्टे  यांच्या सहकार्यातून सदर स्पर्धा संपन्न होणार आहे.  स्पर्धेकरिता खेड तालुका कबड्डी असोसिएशनचे आश्रयदाते मा. आमदार श्री.संजयराव कदम, रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष मा.श्री.सचिनभाई कदम , प्रमुख कार्यवाह मा.रविंद्र देसाई सर यांचे प्रमुख मार्गदर्शन होत आहे.

        खेड तालुका कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष मा.सतिश  चिकणे यांच्या विशेष प्रयत्नातुन संपन्न  होणारी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कार्यकारिणी सदस्य श्री.समद बुरोंडकर व श्री.दाजी राजगुरू खेड तालुका कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष श्री.महेश भोसले व श्री.आनंद हंबीर, सचिव श्री.रविंद्र बैकर, सहसचिव श्री.शरद भोसले, सदस्य श्री.अमोल दळवी, श्री.चंद्रकांत पार्टे, श्री.सुखदेव पवार, श्री.सुभाष आंबेडे, श्री.दीपक यादव, श्री.मंगेश खेडेकर, श्री.दिलीप कारेकर, श्री.आत्माराम बैकर  आदी मेहनत घेत आहेत.

अवश्य वाचा