चिपळूण 

तालुक्यातील ओवळी गावच्या महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी चंद्रकांत संभाजीराव शिंदे यांची बहुमताने निवड करण्यात आली.यावेळी गावचे प्रमुख मार्गदर्शक ,उद्योजक एल.के.शिंदे,सरपंच सुदेश शिंदे,शांतारामराव शिंदे,प्रदीप शिंदे,नंदकुमार शिंदे,अनंतराव शिंदे,सतीश शिंदे,प्रफुल्ल शिंदे,रमेश शिंदे ,उपसरपंच प्रीतम शिंदे,ग्रामपंचायत सदस्या सौ.पाटणकर,उदय कदम,गणपत घाणेकर,रामचंद्र घाणेकर,प्रियवंदा शिंदे,सुधीर शिंदे,विनोद शिंदे,मधुकरराव शिंदे,शाखाप्रमुख अजय शिंदे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

चंद्रकांत शिंदे यांनी सामाजिक माध्यमातून उत्तम कामगिरी केल्याने गावच्या विकासाबाबत त्यांना अनुभव असल्याने त्यांची ग्रामसभेत एकमताने निवड करण्यात आली आहे.त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

अवश्य वाचा