माथेरानचे वीर सुपुत्र हुतात्मा भाई कोतवाल यांच्या जीवनावर आधारित "क्रांतिगड" या काव्याचे लेखनसाहित्य केल्याबद्दल माथेरानचे नारायण सोनावणे यांना पद्मश्री मधू मगेश कर्णिक यांच्या हस्ते गौरविण्यात आले. हा सोनावणे यांच्या काव्याचा संच कर्णिक यांनी या छोटेखानी कार्यक्रमाच्या भेटीत नारायण सोनावणे यांचे कौतुक करून स्वीकारला .

दि १५ सप्टेंबर  रोजी सायं.५ वा.श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ सभागृह,पनवेल मु.येथे 'कोकण मराठी साहित्य परिषद ''कार्यशाळा व  कवी संमेलनाचे 'आयोजन करण्यात आले होते.प्रथम सत्रात लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते कार्यक्रमाचे  उदघाटन झाले.                           कार्यक्रमात कोकण मराठी साहित्य परिषद कर्जत तालुका उपाध्यक्ष रायगड भूषण नारायण भिकू सोनवणे( माथेरान) यांनी हुतात्मा कोतवाल यांच्या भूमिगत क्रांतीचे केंद्र असलेल्या क्रांतिगडावर लिखित "क्रांतिगड" या काव्याचे लेखनसाहित्य पद्मश्री मधू मंगेश कर्णिक यांनी आपल्या भेटीत कौतुकपूर्ण स्वीकारले . यावेळी व्यासपीठावर कवी  रामदास फुटाणे,कवी अरुण म्हात्रे आणि रायगड जनसंपर्क प्रमुख प्रा.एल बी पाटील  व आदी मान्यवर उपस्थित होते.

  माथेरान सारख्या दुर्गम भागातून कोंमसापचे उपाध्यक्ष नारायण सोनावणे याांनी आपल्या लेखन व सामजिक कार्याच्या योगदानामुळे माथेरान गावाचे व कोकण मराठी साहित्याचे नाव  उंचावले. याकारणें रायगड जिल्हा परिषदेचा मानाचा पुरस्कार प्राप्त "रायगड भूषण" मान्यवर यांचा शुभहस्ते सोनवणे यांना पुरस्कृत करण्यात आले. कार्यक्रमात रायगड व महाराष्ट्रातून अनेक मान्यवर साहित्यिक ,लेखक,समाजसेवक उपस्थित होते. कार्यक्रमात मा.रामदास फुटाणे व मा श्री अरुण म्हात्रे यांनी मार्गदर्शन केले.क्रांतिगडचा इतिहास लेखन व क्रांतिगड संस्थापक संघटन कार्याबद्दल मान्यवरांनी माथेरानकर सोनवणे यांनापुढील वाटचाालीसाठी शुभेच्छा दिल्या.

अवश्य वाचा