रोहाअष्टमी 

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्ताने संपूर्ण देशभर स्वच्छता पंधरवडा राबविण्यात येणार आहे. 2 ऑक्टोंबर पर्यंत हा स्वच्छता पंधरवडा संपूर्ण देशभर राबविण्यात येणार आहे. मध्य रेल्वे च्या सर्व स्थानकांवर हि या निमित्ताने स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहेत. रोहा रेल्वे स्थानकावर मंगळवार 17 सप्टेंबर रोजी स्वच्छता पंधरवड्याची सुरवात करण्यात आली.या मध्ये मुख्य वाणिज्य निरीक्षक  पनवेल मीना,रोहा स्थानक प्रबंधक सुरेश कुशवाह,रेल्वे पोलीस उप निरीक्षक चौधरी,आरक्षण तिकीट क्लार्क विरेंद्र सिंग ,कंझ्युमर राईट ऑर्गनायझेशन जिल्हा समन्वयक अजिंक्य रोहेकर,तालुका अध्यक्ष विद्या रोहेकर,सचिव ब्रिजेश भादेकर यांचेसह स्थानकावरील रेल्वे कर्मचारी व बि. एस. रोहेकर कॅंटिन सेवेचे सेवक यांनी सहभाग घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत मोहिमेअंतर्गत देशातील प्रत्येक शासकीय विभाग,त्यातील अधिकारी व नागरिकांनी या पंधरवड्यात आपापले कार्यालय व परिसर स्वच्छ करण्याचे अभियान या काळात राबविण्यात येणार आहे. रोहा स्थानकात झालेल्याव्या स्वच्छता अभियानात स्थानकाच्या प्रवेशद्वारा पासून सर्वत्र स्वच्छता करण्यात आली. स्थानकात कार्यरत असलेले सर्व अधिकारी यांचेसह सामाजिक कार्यकर्त्यांनी यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेत हे स्वच्छता अभियान यशस्वी केले.

अवश्य वाचा