आंबेत

       म्हसळा तालुक्यातील आंबेत या बॅ अंतुले यांच्या जन्मगावी  सरकारी दवाखान्याची इमारत मंजूर झाली असून या इमारतीचे काम सुरू करण्यात आले आहे.गेली अनेक वर्षे ही इमारत शासकीय कार्यालयाच्या गुलदस्त्यात पडून होती, अखेर या रुग्णालयावर शासनाची नजर पडली असून येत्या वर्षभरात या इमारतीचे काम पूर्ण होऊन हे हॉस्पिटल  नागरिकांसाठी खुले करण्यात येईल असं आरोग्य विभागाकडून सांगण्यात येत आहे.तालुक्यात शासकीय सरकारी दवाखान्यांचा प्रश्न एक मोठी समस्या बनून राहिली असून आंबेत खाडीपट्टा विभाग अंतर्गत असणारी गावे गेली कित्येक वर्ष या दवाखान्याच्या प्रतीक्षेत होती,त्यासाठी त्यांना गोरेगाव,चिंभावें ,नांदवी सारख्या अनेक मैल दूर असणाऱ्या दवाखान्यात जावे लागत आहे, म्हसळा तालुक्यात भली मोठी इमारत असून तेथे अद्याप डॉक्टर उपलब्ध नसल्याने रुग्णांची चांगलीच धावपळ उडत आहे,

       आंबेत येथील सरकारी दवाखान्याच्या अनुषंगाने शासनाकडे करण्यात आलेला ५ कोटी रुपयांचा प्रस्ताव अखेर मंजूर होऊन आला आहे आणि याला शासनाने मंजुरी दिली आहे, या इमारतीसाठी    मागील काळात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री बॅ अंतुले यांनी त्यांच्या मुख्यमंत्री काळात बांधलेला आंबेत येथील सरकारी दवाखाना तेथील राखीव असलेली सुमारे 2 एकर जमीन याच जागेवर हे शासकीय रुग्णालय उभारण्याच काम सध्या प्रगतीपथावर सुरू असून  लवकरच हे काम मार्गी लावण्यात येईल असं जिल्ह्याचे आरोग्य विभाग अधिकारी यांनी सांगितलं.आंबेत हे रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांच्या मध्य भागी असून आजूबाजूच्या असणाऱ्या शेकडो गावांना त्याचा पुरेपूर फायदा होईल आणि सोयीचे ठरणार आहे.वाढत्या नागरिकरणासोबत लोकसंख्येतही भर पडत असल्याने आंबेत विभागात स्वतंत्र शासकीय रुग्णालय असणे अत्यंत गरजेचे होते,आणि त्या अनुशंगाने प्रयत्नही  करण्यात आले. या इमारतीच्या निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली आहे. या इमारतीत एकूण .............बेड असणार आहेत त्यात एकूण.......... ऑर्ड असणार आहे ,इमारतीच्या पहिल्या टप्प्याचे काम झाल्यावर दुसऱ्या टप्प्याचा निधी दिला जाणार आहे.अनेक वर्षे या दवाखान्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू असताना प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्याने आता या इमारतीच्या मार्गातील अडथळा दूर झाल्याचे दिसत आहे.

 

 

अवश्य वाचा