मंगळवार दि १७/०९/२०१९ रोजी सुषमा पाटील विद्यालय कामोठे येथे शालेय पावसाळी जिल्हास्तरीय बाॕक्सिंग स्पर्धा आयोजित केली होती . या स्पर्धेत ४० ते ४८ किलो या वजनी गटात कु. श्रद्धा जितेंद्र गावडे हिने तर ५० ते ५२ किलो या वजनी गटात कु. भाग्यश्री दत्तात्रेय साळूंके हिने प्रथम क्रमांक प्राप्त करुन त्यांची विभागीय स्तरावर निवड झाली . तसेच धुळे येथे होणाऱ्या किशोरीगट राज्यस्तरीय स्पर्धेसाठी कु. रितिका पासी हिची निवड करण्यात आली.

या यशाबद्दल  शाळेचे चेअरमन मा. आमदार श्री. बाळाराम पाटील साहेब , शाळा समिती सदस्य मा. मुख्याध्यापिका श्रीम. वैशाली वळवी मॕडम, पर्यवेक्षिका सौ.देवयानी पारकर मॕडम , स्टाफ सेक्रेटरी श्री. रामचंद्र देशमुख , सौ. मिनल पाटील , श्री किशोर पाटील ,शाळेचे शिक्षक ,शिक्षिका तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी क्रिडाशिक्षिका सौ. लता ठाकूर , सौ. लेखा मर्चंडे व यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .

अवश्य वाचा