सुधागड-पाली दि.१८ सष्टेंबर २०१९

सुधागड तालुक्‍यातील सर्वांत मोठी आणि प्रतिष्ठेची मानल्या जाणाऱ्या व-हाड-जांभुळपाडा  ग्रामपंचायतीचे  किंगमेकर म्हणून प्रसिद्ध आसणारे भाजपा कार्यकर्ते संदेश लोंढे यांनी शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला आहे. 

संदेश लोंढे यांनी व-हाड-जांभुळपाडा ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत भाजपा सरपंच पदाचे उमेदवार श्रद्धाताई कानडे यांचे काम केले. कोंग्रेस- मनसे,शेकाप राष्ट्रवादी , शिवसेना चौरंगी लढत आसतांना देखील आपल्या परीने  मेहनत घेत श्रद्धाताई कानाडे या निवडून आल्या .त्यांच्या विजयामागे संदेश लोंढे यांचा सिंहाचा वाटा आहे. संदेश लोंढे यांना व-हाड-जांभुळपाडा अमित शहा बोलले जाते.

व-हाड-जांभुळपाडा जांभुळपाडासह पंचक्रोशीत त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे.गेल्या काही दिवसापासुन ते कार्यक्रमातून दुरदुर होत गेले. भाजपा मधील गट बाजीमुळे कंटाळून अखिर त्यांनी परळी येथे जिल्हा परिषद सदस्य सुरेशशेट खैरेव जिल्हा परिषद सदस्या निलिमाताई पाटील यांच्या उपस्थितीत शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला. 

यावेळी रायगड जिल्हा परिषद सदस्य तसेच रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे वाईट चेअरमन सुरेश खैरे, रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तथा विद्यमान सदस्य नीलिमाताई पाटील, पाली पंचायत समितीच्या सभापती साक्षीताई दिघे ,माजी सभापती भारती शेळके, परळी ग्रामपंचायत उपसरपंच प्रवीण कुंभार ,विठ्ठल सिनकर जांभुळपाडा ग्रामपंचायत सदस्य रोहित भगत,अरिफ मनियार, मंगेश वाघमारे यांच्यासह मोठ्यासंख्येने कार्यकर्ते  उपस्थित होते.

 

अवश्य वाचा