जेएनपीटी दि १८

    द्रोणागिरी नोड परिसरातील आय ओ टी प्रकल्पा जवळील रस्त्यावर असणाऱ्या तरूणांच्या छातीत चिकूनी प्रहार करण्याची घटना मंगळवारी ( दि१७) रात्री ठिक ९ च्या सुमारास घडली.या हल्ल्यात परवेझ अलि समशद अली खान हा २७ वर्षाचा तरुण जागीच ठार झाला आहे.या घटने संदर्भात उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून उरण पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

    पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी दि१७ रोजी रात्री ९ च्या सुमारास परवेझ अलि समशद अली खान हा तरूण आपल्या गाडीसह द्रोणागिरी नोड परिसरातील आय ओ टी प्रकल्पा जवळील रस्त्यावर उभा होता.त्यावेळी तेथील अंधाराचा फायदा उठवत एका अज्ञात व्यक्तीने परवेझ अलि समशद अली खान यांच्या छातीवर आपल्या जवळील चाकूनी प्रहार केला.या हल्ल्यात परवेझ अलि समशद अली खान या तरूणांचा मूत्यू झाला.

   या घटनास्थळावरून आरोपींनी पळ काढला असल्याने उरण पोलीस ठाण्यात सदर अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून परवेझ अलि समशद अली खान यां तरुणाना इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात पोस्ट माटम करण्यासाठी दाखल करण्यात आले आहे.हा खून पूर्ववैमनस्यातून झाला असल्याचे प्रथम तपासून पुढे येत असल्याने उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश कूळकर्णी व गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी अतुल अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली फरार खून्याचा तपास करीत आहेत.

 

अवश्य वाचा