रोहा

शेणवई ग्रामपंचायत हद्दीतील विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि उदघाटन करण्यासाठी आ पंडीत पाटील शेणवई येथे आले असता ग्रामस्थांनी आमदार पंडित पाटील यांची गावातून सवाद्य मिरवणूक काढली. शेकापच्या माध्यमातून होत असलेल्या विकासकामांमुळे कार्यकर्त्यांचा उत्साह मोठ्या प्रमाणात दिसून येत होता.

या प्रसंगी आदिवासीवाडी वरील अंगणवाडी इमारतीचे उदघाटन तसेच विद्यार्थ्यांना गणवेश वाटप,पोषण आहार शिजविण्यासाठी गॅस शेगडी याचे वाटप करण्यात आले. शेणवई शाळेपासून आदिवासी वाडी पर्यंत काढण्यात आलेल्या मिरवणुकीत जागोजागी महिलांनी आमदारांचे औक्षण केले.याच कार्यक्रमात आदिवासी वाडी आणि बौध्दवाडी रस्ता,आदिवासीवाडी येथे स्मशानभूमी शेड,स्वतंत्र पाण्याची टाकी व ग्रामपंचायत कार्यालयाचे भूमिपूजन आ पंडीत पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी मार्गदर्शन करताना आ पंडीत पाटील म्हणाले की,ही गर्दी प्रेमाची आहे.राज्यात सर्वत्र पक्षांतराचे वारे मोठ्या प्रमाणावर वाहत असताना रायगड जिल्ह्यात मात्र शेतकरी कामगार पक्ष कष्टकरी आणि श्रमजीवी जनतेच्या प्रेमाच्या शिदोरीवर ठामपणे उभा आहे.विरोधकांनी या मतदारसंघात केलेले विशेष काम दाखवावे असे आव्हान त्यांनी विरोधकांना दिले.आदिवासी वाडी वरील गोरगरीब जनतेची दिशाभूल करून काही मंडळी स्वतःचा स्वार्थ साधत होती.पण यामुळे आदिवासी वाडीचा विकास मात्र खुंटला होता.या वाडीवरील आदिवासी बांधवांनी आज शेकाप बरोबर येण्याचा निर्णय घेतल्याने त्यांच्या विकासाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे.ग्रामीण भागातील जनतेला विकासापासून वंचित ठेवून केवळ विरोधी पक्षाच्या नेत्यांना आपल्या पक्षात घेण्याचा एककलमी कार्यक्रम विरोधकांनी चालवला आहे असा आरोप देखील आ पाटील यांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने पंस सदस्या गुलाब वाघमारे, सरपंच रुपाली मढवी,जिल्हा चिटणीस मंडळ सदस्य गणेश मढवी,बाजारसमिती माजी सभापती अभिशेठ देशमुख, पुरोगामी युवक संघटना अध्यक्ष जीवन देशमुख, कार्यालयीन चिटणीस जितेंद्र जोशी, खारगाव पंस चिटणीस हरेश म्हात्रे,बाजारसमिती उपसभापती पांडुरंग ठाकूर,भातसई सरपंच गणेश खरिवले, कामगार आघाडी सदस्य सुहास खरिवले,विनायक धामणे,वावे पोटगे सरपंच राम गिजे,भारत पाटील,दत्ताराम मोरे,सुरेश कोतवाल, ज्येष्ठ कार्यकर्ते लिंबाजी साखीळकर,अविनाश पाटील,गोवर्धन कांडणेकर यांच्यासह भातसई विभागातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अवश्य वाचा