आंबेत

    आंबेत मध्ये गेली कित्येक दिवस अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या दोन जणांना पोलिसांनी काल छुप्या पद्धतीने छापा टाकून रंगेहात पकडून  देशी विदेशी दारूचा सुमारे ३० हजार ६० रुपयांचा मुद्देमाल व रोख रक्कम रुपये १ लक्ष ३० हजार ४३० रुपये अशी रोकड जप्त केली.आंबेत येथील समीर यशवंत वाईकर वय वर्ष ४५ हा दारूविक्रेता गेली कित्येक वर्षे आंबेत येथे त्याच्या राहत्या घरी  विनापरवाना दारूविक्री करत असून शासनाच्या नियमाचे उल्लंघन केल्यामुळे तसेच आंबेत येथील देशी दारू विक्रेता गणेश बाबुराव सावंत याला राहत्या घरी देशी दारूची विक्री करीत असताना पोलिसांनी रंगेहाथ पकडून त्यांच्या विरोधात गोरेगाव पोलीस ठाणेअंतर्गत कलम मुंबई पोव्ही ऍक्ट कलम ६५ खंड 'ड' प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.विना परवाना आरोपी समीर वाईकर यांच्या घरी छापा टाकल्यानंतर राहत्या घरात पोलिसांनी आणखी झडती घेतली असता वाईकर याच्या बेडरूम मधून सुमारे भरपूर दारू साठा तसेच रोखड रक्कम हाती लागल्याची सविस्तर माहिती पोलिसांकडून सांगण्यात आली.वाईकर हे गेली कित्येक दिवसांपासून अवैध दारूची विक्री करीत असल्याची खात्रीशीर माहिती आंबेत पोलीस चेक पोस्टचे हेड कॉन्स्टेबल गणेश पवार यांना कानोकान माहीत असल्याने तात्काळ सावधगिरी बाळगता गोरेगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री टोम्पे यांचे मार्गदर्शन घेऊन सहाय्यक पोलीस कर्मचारी श्री ढोबळे, व्ही एम ठाकूर,  आर ए, गोसावी,पी आर साळुंखे यांनी ही मोहीम यशस्वी पार पडल्याची कबुली गोरेगाव पोलीस ठाणे अंतर्गत तपास अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आली,यानंतर लगेचच या अवैध दारूविक्रेत्यांच्या मुसक्या अवळण्यात आल्या.

    

अवश्य वाचा