पाली/बेणसे 

  पेण तालुक्यातील जोहे येथील वृद्ध दाम्पत्याला मारहाण केल्याचा प्रकार नुकताच समोर आला आहे. याप्रकरणी  सबंधिताविरोधात  पोलिस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे. याबरोबरच रायगड जिल्हा पोलिस अधीक्षक अनिल पारसकर यांच्याकडे तक्रारी निवेदन दिले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की जोहे गावचे रहिवाशी असलेले तसेच पीडित तक्रारदार शंकर देहू मोकल व सुदर्शन उर्फ बाळा मोकल हे एकाच गावचे रहिवाशी आहेत. तक्रारदार शंकर मोकल यांचे घराचे समोर बाळा मोकल यांनी माशाचे तलाव चालविण्यास घेतले आहे. अशातच शंकर मोकल यांनी तलावाचे शेजारी असलेले कुंपणामध्ये फॉरेट टाकले हे बाळा मोकल यांना समजल्याने त्यांनी  तक्रारदार शंकर मोकल (७३) व पत्नी अनुसया शंकर मोकल (७१)यांना तुम्ही माझ्या कुंपणात फॉरेट का टाकले? ते तळ्यात जाऊन मासे मरतील असे बोलून तक्रारदार यांना हाताबूक्याने मारहाण करून शिवीगाळ व धमकी दिली अशी तक्रार नोंदवण्यात आली. त्यानुसार दादर सागरी पोलीस स्थानकात संबंधीताविरोधात भादवी कलम 323, 504,506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास दादर सागरी पोलीस करीत आहेत.

अवश्य वाचा