पनवेल 

      तालुक्यातील तळोजा परिसरातील वलप येथे एका गोडाऊनवर मुंबई दहशतवाद विरोधी पथकाने धाड टाकून ५२ कोटी रुपयांचा एम.डी. पावडरचा घातक साठा हस्तगत करून याप्रकरणी पाच जणांना ताब्यात घेतले आहे. यावेळी वलप येथील गोडाऊनला सील ठोकण्याची कारवाई करण्यात आली आहे. 

      याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, यातील संशयित जितेंद्र परमार यांनी आपल्या साथीदारांसह एम.डी. ही घातक पावडर विक्रीसाठी विक्रोळी येथे घेऊन येणार असल्याची माहिती मुंबई दहशतवाद विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार यातील पथकातीन पोलीस निरीक्षक संदीप विश्वासराव, अनिल ढोले, गिरीश बने यांच्या पथकाने भांडुप परिसरात सापळा रचला होता. यावेळी मिळालेल्या माहितीच्या आधारे सुलेमान आणि इरफान यांना एम.डी.पावडर सोबत घेऊन जाताना अटक करण्यात आली. यावेळी त्यांच्याकडे तब्बल ९ किलो एम.डी. पावडर आढळून आली. यावेळी त्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांची अधिक चौकशी केली असता, सदर एम.डी.पावडरचा कारखाना हा पनवेल तालुक्यातील तळोजा परिसरातील वलप याठिकाणी असल्याचे समोर आले. यानंतर पथकाने वलप येथील गोडाऊनवर धाड टाकली असता याठिकाणी १२० किलो एम.डी. पावडर जप्त केली व या गोडाऊनला सील ठोकले आहे. यावेळी धाड टाकल्यानंतर जितेंद्र परमार उर्फ आसिफ, टेंभोडे गावातील रहिवाशी नरेश मस्कर, अब्दुल रजाक, सुलेमान शेख आणि इरफान खान या पाच जणांना एटीएसच्या पथकाने संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे. 

अवश्य वाचा