पंढरपूर 

गणेशोत्सव विसर्जनाच्या मिरवणुकीत बंदोबस्तास पेट्रोलिंग करत असताना बनावट नोटा तयार करणाऱ्या भामट्यास जेरबंद करण्यात पंढरपूर शहर पोलिसांना यश आले आहे. पंढरपूर येथील केबीपी चौकात शुक्रवार दिनांक 13 सप्टेंबर रोजी  रणजीत सुखदेव राजगे रा. कुसमूड ता. माळशिरस हा युवक संशयास्पद रित्या फिरत होता. त्याला  पोलिसांनी हटकले असता तो पळून जाण्याच्या बेतात होता. पोलिसांनी त्याची बॅग तपासल्यानंतर त्याच्याजवळ 11,550 रुपयाच्या बनावट नोटा मिळाल्या. त्याच्यावर गु.र.नं. 1481/ 2019 भा द वि कलम 489 अ 489 क व 489 इ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्याच्याकडून काळया रंगाचा चा कलर प्रिंटर चार रंगीत शाईच्या बाटल्या तीन मोबाईल 14 सिम कार्ड जप्त करण्यात आले आहेत. सदर आरोपीने काही दिवसापूर्वी 50 रुपयांच्या बनवत असलेल्या नोटा बाजारात आणण्याचा प्रयत्न केला होता. सदर आरोपीस पोलीस कोठडी देण्यात आली आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, पंढरपूर डीवायएसपी सागर कवडे, यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक दयानंद गावडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नवनाथ गायकवाड, हनुमंत देशमुख, सुजित उबाळे, मच्छिंद्र राजगे, संदीप पाटील या पथकाने कामगिरी केली असून, पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल नवनाथ गायकवाड करीत आहेत.

अवश्य वाचा