मोहोपाडा

भाजपाचे खालापूर तालुका उपाध्यक्ष यशवंत मुले हे सामान्य नागरिकांच्या आग्रहाखातीर विधानसभेची निवडणूक लढविणार असून त्यांची उरण विधानसभा मतदारसंघात इच्छुक उमेदवारांत त्यांची मुलाखत झाली आहे.पक्षाकडून उमेदवारी नाही मिळाली तरी अपक्ष राहून निवडणुक लढविणार असल्याचा निर्धांर केला आहे.याबाबत खालापूर शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेऊन आपल्याच पक्षावर शरसंधान साधले.यावेली पत्रकारांशी संवाद साधताना मुले म्हणाले की आपण पक्षाचे तीसवर्षांपासून प्रामाणिक काम करीत आलो आहे.पक्षाकडे सभागृहात दोनच सदस्य असताना कोणत्याही गोष्टीची अपेक्षा न ठेवता काम करणाऱ्या प्रामाणिक कार्यकर्त्यांचा विचार केला जात नसल्याने आमच्या सारख्या सामान्य कार्यकर्त्याकडे पर्यांय शिल्लक राहत नाही.सामान्य नागरिकांच्या आग्रहाखातीर मी पक्षाकडे उरण मतदारसंघातून उमेदवारी मागितली आहे.पक्षाने माझ्या नावाचा विचार न केल्यास मी उरण तसेच कर्जंत खालापूर या दोन्ही विधानसभा मतदार संघातून अपक्ष राहून निवडणुक लढविण्याचा  तयारीत आहे.यावेली आपण निवडणूक लढविण्यासाठी का इच्छुक आहात?असा प्रश्न पत्रकारांनी मुले यांना केला असता त्यांनी स्वताच्याच पक्षावर आरोप करीत सत्तेत असतानाही कोणतीच विकासकामे झाली नसल्यानेच आपण निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे.मी माझ्या निर्णंयावर ठाम आहे.

मी गरीब शेतकरी कुटुंबातील असल्याने गरीबांचे दु:ख काय आहे याची मला पूर्ण कल्पना आहे.मी माझ्या ग्रामपंचायतीत माझ्यासह अन्य तीन सदस्य निवडून आणत आहे.गेली अनेक वर्षे मी वावंढल ग्रामपंचायतीचा सदस्य असल्याने विकासकामे कशी करायची,याची मला पुर्ण कल्पना आहे.एकंदरीत भाजपा पक्षाने मला उमेदवारी न दिल्यास अपक्ष राहून निवडणुक लढविणार असल्याचे यशवंत मुले यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.

 

अवश्य वाचा