पेणशहर

पेण पोलीस ठाणे हद्दीत ता.१५ रविवार रोजी १:३०   वाजण्याच्या सुमारास महिला फिर्यादी रा.श्री आर के ड़िल्डीन् रूम नं. २०७,संजय जाधव चिचंपाडा ता.पेण यांचे सोन्याच्या मण्याची माळ व रोख रक्कम, मोबाईल,मतदान कार्ड व आधार कार्ड असे एकूण ५२६५०/- रुपये किमतीचे वस्तू कोणीतरी दोन अनोळखी इसमांनी संगनमत करून फिर्यादी यांना बोलण्यात गुंतवून फसवणुक करून काढुन घेवुन आम्ही तुम्हाला वस्तु घेवुन १० ते १५ मिनीटांनी परत येतो तुम्ही येथेच थांबा असे सांगून ते मौजे गांधी वाचनालयाच्या कंम्पाउंडच्या बाहेर निघुन गेले व परत आले नाही.याबाबत पेण पोलीस ठाणे येथे गुन्हा कॉ.गु.र.न.१४८/२०१९भा.दं.वि.क.४२०,३४प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सपोनि/श्री.डी.बी.वेडे हे करीत आहेत तर दुसऱ्या चोरीच्या घटनेत पेण पोलीस ठाणे हद्दीत ता.११ रोजी १०:०० वा ते ता . १५ रोजी १० वा. दरम्यान महिला फिर्यादी रा. प्राजक्ता बंगला प्लॉट नं.७२६ म्हाडा कॉलनी ता.पेण यांच्या मातोश्री यांचे बंद बंगल्याचे कोणीतरी अज्ञात चोरटयाने बंद घराचे तळ मजल्यावरील सेफ्टी दरवाज्याचा कुलुप तोडुन त्यावाटे वरच्या मजल्यावर जावुन वरच्या रूमच्या सेफ्टी दरवाज्याचा लॅच तसेच मेन दरवाज्याची कडीकोंयडा व लॅच तोडुन त्यावाटे आत प्रवेश करून बेडरूम मधील लाकडी दरवाज्याचा कुलुप तोडुन कपाटात ठेवलेली एकूण ५१,०००/- रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम कोणीतरी अज्ञात चोरटयाने फिर्यादीचे संमतीशिवाय स्वत:चे फायदयाकरिता घरफोडी चोरी करून चोरून नेले. याबाबत पेण पोलीस ठाणे येथे गुन्हा कॉ.गु.र.न.१४९/२०१९ भा.दं.वि.क ३८०,४५४,४५७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोसई/श्री.एम.व्ही.कदम हे करीत आहे तर पेण शहरात वाढत असलेल्या चोरीच्या घटने मुळे नागरिकांमध्ये भिती निर्माण झाली आहे.

अवश्य वाचा