सुधागड-पाली 

सुधागड पाली पोलीस निरीक्षक म्हणून  बाळा रघुनाथ कुंभार यांनी नव्याने पोलीस पोलिस ठाण्याचा पदभार स्वीकारली. सुधागड तालुक्यातील अवैध धंदे मुळासकट उखडून टाकणार असल्याचे कुंभार यांनी पाली पोलीस ठाण्याची सूत्रे हाती घेताना सांगितले होते."मेरा वचन ही मेरा शासन है" म्हणत पदभार हाती घेताच आपल्या धडाकेबाज कामगिरी सुरुवात केली असुन पाली येथे अवैध मटका सुरु असल्याची माहिती मिळताच पाली पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांच्यासह  पोलीस पथकाने पालीतील  खडकआली येथे चालणाऱ्या एका मटका, छापा घालून एका जणाच्याविरोधात जुगारप्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. 

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 

पाली येथील खडकआली  बेकायदेशीररित्या मटका जुगार सुरू असल्याची माहिती पोलीस निरिक्षक बाळा कुंभार  यांना समजली त्यानुसार सायंकाळी सहाच्या सुमारास यांच्या पथकाने  अचानक खडकआली येथील एका गल्लीत बेकायदेशीर मटका धंदा चालत असल्याचे आढळून आले.व त्यावेळी कल्याण मटका जुगाराची साधने व ९१० रुपये रोख सापडले रोख रक्कम व कल्याण मटका जुगाराची साधने जप्त करण्यात आले.तसेच किशोर प्रभाकर दांडेकर वय ६३(रा.खडक आली पाली ता. सुधागड ), यांच्या  विरोधात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम २०१२ कलम १२ (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात पोलीस पाली पोलीस निरीक्षक बाळा कुभार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस कर्मचारी पो.ना.सुरज फडताडे , पो.ना.आर.के.राठोड  यांनी छापा टाकले.पोलीसांनी या ठिकाणाहून रोख रक्कम सहमुद्देमाल जप्त केला आहे.पाली पोलीस निरिक्षक बाळा कुंभार यांच्या  मार्गदर्शनाखाली महिला पोलीस  पो.ह.एम.एम.लांगी तपास करत आहेत.

अवश्य वाचा