नेरळ,

       कर्जत तालुक्यात चोरीच्या घटना काही कमी होण्याचे नाव घेत नाहीत. रात्री शेलू रेल्वे स्थानक परिसरात असलेली दोन दुकाने आणि तेथील बँक ऑफ बडोदा यांचे एटीम मशीन फोडून टाकले आहे. मागील १५ दिवसात चार दुकाने चोरट्यांनी फोडून त्यातील किमती वस्तू लंपास केल्या होत्या. 

         १३ सप्टेंबर च्या रात्री शेलू रेल्वे स्थानक परिसरातील बँक ऑफ बडोदा चे एटीम मशीन चोरट्यांनी फोडले. त्यातून काय नेले याची माहिती बँकेचे अधिकारी प्रत्यक्ष आले नसल्याने कळू शकले नाही. तर रात्री त्याच भागातील भाऊ मसणे यांचे दीक्षा स्नॅक्स कॉर्नर आणि सीवा सुब्रह्मण्यम यादव यांचे प्रिया माधव स्नॅक्स सेंटर हे दुकान फोडले. त्यामुळे शेलू परिसरात्त मोठी खळबळ माजली आहे.त्याच भागातील जगदंबा इलेक्र्टिकल आणि जगदंबा हार्डवेअर,प्रणिता स्टेशनरी कलेक्शन,आणि सोमनाथ डुकरे यांचे घर फोडले होते.

अवश्य वाचा