मुरुड जंजिरा   

    मुरुड शहरातील  सर एस ए हायस्कूल मधील वरिष्ठ लिपिक पदावर कार्यरत असलेले आण्णा बाबू वाडकर यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल रायगड जिल्हा परिषदेमार्फत त्यांना उकृष्ठ लिपिक म्हणू गौरवण्यात आले आहे.

    त्याना रायगड जिल्हा परिषदेमार्फत शाल श्रीफळ सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.त्यांचा सत्कार आमदार जयंतभाई पाटील यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी रायगडचे खासदार सुनील तटकरे,रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष अदिती तटकरे,जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आस्वाद पाटील व अन्यमान्यवर उपस्थित होते.

          आण्णा वाडकर हे सर एस ए हायस्कूल मध्ये गेली ३३ वर्ष कार्यरत असून त्यांनी त्यांच्या या कालावधीत दहावी व बारावीच्या परीक्षांना मदत करणे,परीक्षांचे नियोजन करणे,नवनियुक्त शिक्षकांच्या मान्यता आणणे,विद्यार्थ्यांना शासनाच्या विविध योजनेचा लाभ मिळवून देणे,सेवा पुस्तकात नोंदी करणे,सेवानिवृत्त शिक्षकांना पेन्शन मिळवून देण्यासाठी त्यांची पेन्शन प्रकरणे तयार करणे आदी सर्व कार्य न चुकता व वेळेत करून त्यांच्या या अखंड सेवेत कोणतीही चूक अथवा गलथान कारभार न झाल्याने वाडकर यांची उत्कृष्ठ लिपिक म्हणून निवड करण्यात आली आहे.

   वाडकर यांची उत्कृष्ठ लिपिक म्हणून निवड होताच त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. 

अवश्य वाचा