खांब-रोहे,दि.१०

     रोहे तालुक्यातील प्राथमिक शिक्षक तथा यशवंतखार गावचे सुपुत्र नारायण रामचंद्र गायकर यांना रा.जि.परिषदेने आदर्श शिक्षक पुरस्कार पुरस्कार देऊन एका शानदार कार्यक्रमात सन्मान करण्यात आला आहे.

       रा.जि.परिषदेच्या वतीने सन २०१९/२० मधील जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार आणि गुणवंत विद्यार्थी यांचा सन्मान सोहळा जि.प.अध्यक्षा आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली चेंढरे येथील पी.एन.पी.नाट्यगृह येथे मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला. यावेळी खा.सुनील तटकरे, आ.पंडित पाटील, आ.बाळाराम पाटील, जि.प.उपाध्यक्ष अँड.आस्वाद पाटील,शिक्षण व आरोग्य सभापती नरेश पाटील,महिला व बालकल्याण सभापती उमा मुंढे,क्रुषी व पशू संवर्धन सभापती प्रमोद पाटील, सदस्या सुश्रुता पाटील,चित्रलेखा पाटील, प्रियदर्शनी पाटील,मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे,माध्य.शिक्षणाधिकारी बाळासाहेब थोरात आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

          नारायण गायकर हे गेली २६ वर्षे शिक्षकी सेवेत कार्यरत असताना एक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून त्यांची विशेष ओळख आहे.तर शासनाच्या विविध शैक्षणिक योजनांच लाभ शाळा व विद्यार्थी यांना कसा मिळेल यासाठी त्यांचे नेहमीचेच प्रयत्न असतात. शैक्षणिक क्षेत्राबरोबरच सामाजिक, कला,क्रीडा आदी क्षेत्रातही त्यांचे नेहमीचेच योगदान असते.त्यांच्या या विशेष कार्याबद्दल त्यांचा रा.जि.परिषदेने आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरव केला आहे.त्यांनी मिळविलेल्या सुयशाबद्दल रोहे तालुक्यासह जिल्ह्यातील शिक्षक वर्गाकडून तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळींसह यशवंतखार ग्रामस्थ, महिला व तरुण मंडळाकडून त्यांचे अभिनंदन व्यक्त होताना दिसत आहे.

अवश्य वाचा