माणगाव 

        निजामपूर भागाच्या विकासासाठी आघाडी सरकारच्या काळात आमचे नेते माजी कृषिमंत्री शरद पवार यांच्याकडे आमचे पिताश्री खा. सुनील तटकरे यांनी विळे भागाड औद्योगिकक्षेत्राचा प्रश्न लाऊन धरला या भागातील तरुण मोठया प्रमाणात इथे रोजगाराची साधने नसल्याने ते मुंबई – सुरत व अन्य ठिकाणी स्थलांतर करून जात आहेत. विळे - भागाड येथे औधोगीकीकारण उभारल्यास तेथील नागरिकांना स्थानिक रोजगार उपलब्ध होईल या साठी माजी मुख्यमंत्री दिवंगत बॉ. ए. आर. अंतुले यांच्याकडे पाठपुरावा करून औद्युगिकक्षेत्र मंजुर करून घेतले. व आज हे औधोगीकीकरन मोठ्या झपाट्याने वाढत आहे. येथील पोस्को कंपनी प्रशासनाची मुजोरी या पुढे राष्ट्रवादी कॉ. पक्ष खपवून घेणार नाही या पुढे स्थानिक भूमिपुत्रांना व तरुण बेरोजगारांना या कंपन्यात रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी राष्ट्रवादी कॉ. प्रयत्नशील राहील असे ग्वाही देत येथील भूमिपुत्र व स्थानिक तरुणाना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहू असा शब्द बोंडशेत येथील रस्त्याच्या भूमिपूजनात विधान परिषदेचे आ. अनिकेत तटकरेंनी यांनी बोलताना दिला. त्यामुळे स्थानिक बेरोजगारांना रोजगाराची संधी मिळण्याच्या आशा आता पल्लवित झाल्या आहेत.    

         जिल्हा नियोजन आराखडा 19 - 20 अंतर्गत इतर जिल्हा रस्ते मजबूती करण व डांबरीकरण योजने अंतर्गत बोंडशेत ते चांदेवाडी रस्ता करणे 9.00 लक्ष रुपये कामाचा भूमिपूजन व सत्कार सोहळा आ. अनिकेत तटकरे यांचे हस्ते माणगाव तालुक्यातील बोंडशेत येथे ता. 7 सप्टेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता संपन्न झाला. यावेळी आ. तटकरे म्हणाले कि, लोकसभा निवडणुकीत भाले ग्रामपंचायतीने खा. सुनील तटकरे यांना मोठया प्रमाणात मताधिक्य दिले हि ग्रामपंचायातीतील गावे नेहमीच खा. तटकरे साहेबांच्या पाठीशी उभी राहिली त्यामुळे राष्ट्रवादी कॉ. पक्षाचे माध्यमातून या भागातील विविध विकास कामे या पुढेही केली जातील. असा शब्द दिला येथील स्थानिक तरुणांच्या पाठीशी आम्ही ठाम उभे राहू अशी ग्वाही दिली.

      यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी कॉ. पक्षाचे निजामपूर विभाग अध्यक्ष बाबुशेठ खानविलकर, जेष्ट नेते निजामपूर ग्रा. प. सरपंच राजाभाऊ रणपिसे, माणगाव प.स. माजी उपसभापती तुकाराम सुतार,  भाले ग्रा.प. सरपंच विवेक खानविलकर, व सर्व ग्रामपंचायतीचे सदस्य, जेष्ट नेते धोंडू मांडवकर, महेश कोंडेकर, एकनाथ मानकर, संदीप जाधव, तसेच मुंबईकर मंडळ, महिला मंडळ व तरुण यूवक मोठया संखेने उपस्थित होते.

अवश्य वाचा

शिघ्रे नदी बनलेय डंम्पिंग.