हमरापूर 

      स्टेट बँक ऑफ इंडियाच्या क्षेञीय कार्यालय पेणच्यावतीने जिल्हा पातळीवर ग्राहक मेळावा आयोजन करण्यात आले होते.

      या कार्यक्रमास बँकेचे मुंबई झोनचे उप महाप्रबंधक प्रवाकर साहु, पेण येथील रायगड जिल्हा क्षेञीय कार्यालयाचे सहा. प्रबंधक कुमार परिमल प्रेम, मुख्य प्रबंधक राजीव धवड, उमेशचंद्र डोंगारिया, सुधीर मेश्राम, पेण शाखेचे मुख्य प्रबंधक धर्मेंद्र कुमार सिंग यांच्यासह बँकेचे ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

        सदर मेळाव्यात उपस्थित ग्राहकांना बँकेच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली.  यावेळी ग्राहकांनी त्यांच्या बँकेबद्दलच्या भावना व्यक्त केल्या. आणि काही सुधारणाही सुचवल्या.

        यावेळी उप महाप्रबंधक  प्रभाकर सुहु यांनी ग्राहकांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे दिली आणि सर्वानां मार्गदर्शन केले. 

        तर राजेश वाघेला यांनी आभार ग्राहकांचे आभार मानल्यानंतर कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.  

अवश्य वाचा