अलिबाग

शेतीसाठी आवश्यक असणार्‍या खतांचा 15 दिवसांपासून तुटवडा दिसून येत असल्याने अस्मानी संकटानंतर आता या एकप्रकारच्या सुलतानी संकटामुळे शेतकरी राजा हतबल झाल आहे. राष्ट्रीय केमीकल्स आणि फर्टीलायझर्स खत कारखाना जिल्ह्यातील अलिबाग थळ येथे असतानाही गलथान व्यवस्थापनामुळे युरीयाचा पुरवठा वेळेवर होत नसल्याचा आरोप जिल्हा परिषदेचे माजी सदस्य द्वारकानाथ नाईक यांनी केला आहे.
वार्षीक सरासरीपेक्षा अधिक पाऊस ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच आठवडयापर्यंत पडल्यामुळे आधिच जिल्ह्यातील शेतकर्‍यांना अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या संकटाचा सामना करण्याची वेळ ओढवली. त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करीत असतानाच आता अत्यावश्यक असणार्‍या खतांच्या टंचाईला सामोरे जावे लागत इाीक.
खरीप हंगामासाठी जिल्ह्याला 24 हजार 860 क्विंटल खतांचे आवंटन मंजुर करण्यात आले होते त्यापैकी पहिल्या टप्प्यात 10 हजार क्विंटल तर दुसर्‍या टप्प्यात 4 हजाराच्या आसपास खतांचा पुरवठा करण्यात आला आला होता. मात्र त्यानंतर उद्भवलेल्या परिस्थितीमुळे आवश्यक असणारा खतपुरवठा होत नसल्याची ओरड शेतकर्‍यांमधून केली जात आहे.
’आरसीएफ’च्या थळ येथील युरिया खताच्या कारखान्यात दुरुस्ती-देखभाल सुरु असल्याने हे उत्पादन बंद असल्याचे समजते. त्यामुळे यावर्षी होणारा खतपूरवठा मुंबईतून केला जात असल्याने ही टंचाईची समस्या उदभवली असल्याचे वृत्त आहे. हा प्रकल्प बंद राहिल्याने सर्वाधिक मागणी असलेले या प्रकल्पाचे खत न मिळाल्यास शेतकर्‍यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. त्यामुळे तात्काळ ’आरसीएफ’च्या खताचा पुरवठा व्हावा, अशी मागणी होत आहे. 
जिल्ह्यातशासकीय नोंदणीकृत केंद्रे असून, विक्री ऑनलाइन पद्धतीने पॉस मशिनद्वारा केली जाते. याकरिता खताची खरेदी करणार्‍या शेतकर्‍यांना त्यांच्या जमिनीचा सातबारा उतारा, आधार कार्ड किंवा बोटांच्या ठसे याद्वारे खरेदी करणे शक्य होणार आहे. या विकीदरम्यान इंटरनेट कनेक्टिव्हिटीच्या अडचणींमुळे तसेच काही ठिकाणी पॉस मशिनमध्ये तांत्रिक समस्या येत येत आहेत. मशिनमध्ये बिघाड झाल्यास त्यांना सहजपणे बदलता यावे म्हणून 15 पॉस मशिन तसेच बॅटरी उपलब्ध करून देण्यात आल्या असल्याचे सांगण्यात आले. सद्यस्थितीत युरिया खताला सर्वाधिक मागणी असून युरिया, सुफला व इतर प्रचलित खत बाजारामध्ये पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने युरियाची वाढीव दराने विक्री होत असल्याचा आरोप शेतकर्‍यांकडून केला जात आहे.

आरसीएफ कारखाना जवळ असूनही जिल्ह्यातील शेतकर्‍यांता खताचा पुरवठा योग्य पद्धतीने होत नाही ही मोठी शोकांतिका आहे.

मंजुर 24 हजार 860 क्विंटल खतांचे आवंटनापैकी पहिल्या टप्प्यात 10 हजार क्विंटल तर दुसर्‍या टप्प्यात 4 हजार अशा सुमारे 14 हजार क्विंटल खतााच्या आसपास खतांचा पुरवठा करण्यात आला आहे.

अवश्य वाचा