पंढरपूर 

       अलीकडच्या काळात महावितरणची वीज चोरी फार मोठ्या प्रमाणात होत आहे. या वीज चोरीवर आळा घालण्यासाठी कोर्टी (तालुका पंढरपूर) येथील विद्युत विभागात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनींनी वीज चोरी पकडण्याचा प्रकल्प तयार केला आहे अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर कैलास कारंडे यांनी दिली.

     जी. एस.एम. द्वारे वीज चोरीवर आळा घालू शकतो.असा एक प्रकल्प सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कोर्टी  पंढरपूर महाविद्यालयातील इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग विभागात शेवटच्यावर्षात शिक्षण घेत असलेल्या कु. ज्योती चौगुले, कोमल बंडगर, मोहिनी भिंगारे व स्नेहल पाटील या विद्यार्थ्यांनी जी.एस.एम. द्वारे विजचोरी पकडण्याचा हा प्रकल्प तयार केला असून यामध्ये घरगुती स्तरावर केल्या जाणार्‍या वीज चोरीवर आळा बनविण्यासाठी हा प्रकल्प महत्वपूर्ण ठरणार असल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला आहे.

     जी.एस.एम.गोबल सिस्टिम फॉर मोबाइल कम्युनिकेशन वापरून आपण विचोरी पकडून त्यास आळा बसवू शकतो. एक विशिष्ट असा नवीन प्रकार तयार केलेल्या प्रकल्पामध्ये विजेचा मीटर वापरून आपण वीजचोरी पकडू शकतो. हा मीटर असा तयार केला आहे की, जेव्हा कोणी आतील वायरिंग बदलून वीज चोरीचा करण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तेव्हा ते लगेच मीटरमध्ये पकडून वीज बोर्डाला त्याचा एक संदेश जाईल. या संदेश वरून असे लक्षात येईल की, कोणीतरी वायरिंग बदलत आहे. दुसरा महत्वाचा उपयोग म्हणजे या प्रकल्पातून थेट विज वापर केलेले रिडिंग विज बोर्डाला जातात. प्रत्येक के. डब्ल्यू. एच. वापरानंतर आपोआप त्याची रीडिंग बोर्ड ला मिळेल. त्यामुळे एकुण किती युनिट वापर झाला आहे यावरून महावितरण कंपनीला बील आकारता येईल.

   विद्यार्थीनीनी स्वतःची कल्पना वापरून हा छोटासा प्रकल्प तयार केला आहे. या मधुन दोन्ही बाजूला आपण या प्रकल्पातुन दोन्ही हेतू साध्य करू शकतो. विद्यार्थीनीनी  तयार केलेल्या ह्या प्रकल्पाचे जिल्हा स्तरातून सर्वत्र कौतुक होत आहे.

      हा प्रकल्प तयार करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे विभाग प्रमुख प्रा. श्रीनिवास गंजेवार, प्रकल्प मार्गदर्शक प्रा. सागर दाढे यांचे मार्गदर्शन लाभले.


अवश्य वाचा