नेरळ

       नेरळ ग्रामपन्चायतमध्ये असलेले ब्रिटिश क्लीन धरणातून तब्बल दहा वर्षानंतर गाळ काढण्यात येत आहे. आतापर्यंत किमान ९०० ट्रक मातीचा गाळ बाहेर काढण्यात आला असून मोठ्या प्रमाणात दगड देखील बाहेर काढले असून धरणातील पाणी साठा अधिक होण्यास मदत होणार आहे. तर दुसरीकडे धरणातील गाळ काढताना त्या परिसरात तब्ब्ल दोन ठिकाणी गार्डन विकसित कारण्यास जागा उपलब्ध झाली आहे. 

        नेरळ ग्रामपन्चायतच्या मालकीचे असलेले ब्रिटिश कालीन धरण हे गेल्या काही वर्षात स्वच्छ केले नसल्याने मातीने हरले होते. यावर्षी अनेक स्थानिकांनी मागणी केल्यानंतर नेरळ ग्रामपंचायतने निधीची तरतूद करून मे महिन्यात धरणातील शिल्लक असलेले पाणी सोडून दिले होते. त्यानंतर गेली १५ दिवस धरणातील गाळ काढण्याचे काम नेरळक ग्रामपंचायत कडून सुरु आहे. धरणात माथेरान डोंगरातून वाहून येणारे पाणी मोठ्या प्रमाणात येत असल्याने दरवर्षी पाण्याबरोबर दगड आणि माती वाहून येत असते. त्यामुळे  एकर परिसरात असलेल्या धरतील किमान तीन एकर चा परिसर दगड आणि मातीने व्यापला होता. त्यामुळे धरणाचा जलाशय उरलेल्या ठिकाणी माती आणि दगड काढून काही फायदा नाही तर धरणातील पाणी साठा वाढावा असा प्रयत्न उपसरपंच अंकुश शेळके यांनी सुरु केला.  आधी पाणी सोडून दिल्यानंतर धरणाच्या तिन्ही बाजूला जेसीबी मशीनच्या साहायाने जलसाठा वाढविण्यासाठी प्रयत्न सुरु केले आणि आज त्या ठिकाणी मोहचीवाडी बाजूला एक मोठे मैदान निर्माण झाले आहे. 

        तर धरणातील पाणी सोडल्यानंतर ज्याला हवी आहे त्याला गाळयुक्त माती नेण्याचे धोरण सरपंच जान्हवी साळुंखे यांनी जाहीर केल्याने अनेकांनी आपल्या शेतीसाठी खत होऊ शकेल अशी माती नेण्यास भर दिला. त्यामुळे धरणाच्या मुख्य जलाशयातील माती अधिक लवकर  काढली जाऊ शकली. या काळात नेरळकरांना आश्चर्य वाटेल असे काम त्या ठिकाणी झालेले दिसून आले. कारण तब्बल दोन पायऱ्या म्हणजे किमान १५ फूट जे मातीत अनेक वर्षे गाडून गेले होते,ते पुन्हा बाहेर येण्यात उपयोग झाला आहे.धरणातील पाणी साठा वाढावा हा हेतू ग्रामपंचायतने ठेवलेला नाही तर ब्रिटिश कालीन धरण अधिक मजबूत करण्यासाठी आता प्रयत्न सुरु केले आहेत. त्या ठिकाणी असलेला बंधाऱयाला असलेली गळती रोखण्यासाठी बांधकाम केले जात आहेत. तत्कालीन सरपंच भगवान चंचे यांनी त्या भागात निर्माण केलेले पर्यटन केंद्र यांची डागडुगी देखील नेरळ ग्रामपंचायत सध्या करीत आहे. तर धरणाच्या खाली नव्याने मातीचा भराव करून त्या ठिकाणी एक बगीचा या पावसाळ्यात फुलविला जाणार आहे अशी माहिती सरपंच जान्हवी साळुंखे यांनी दिली आहे. 


 

अवश्य वाचा

other

सोमवारी उरणमधील दवाखाने बंद