नेरळ

        कर्जत येथून वाहत नेरळ कडे येत असताना दहिवली गावाजवळ उल्हासनदीच्या तिऱ्यावर असलेल्या लब्धी गार्डन  प्रदुषित पाणी सोडत असल्याची तक्रार उल्हासनदी बचाव मोहिमेचे कार्यकर्ते केशव बबन तरे यांनी लेखी पत्र महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ, जिल्हाधिकारी, नगर रचना आणि मुल्यनिर्धारण विभाग रायगड, तहसिलदार यांना लेखी तक्रार केली आहे.दरम्यान,त्या ठिकाणी जमीन विकसित करीत असलेल्या  विकासकाने आपल्या सोसायटी मधील एक लिटर पाणी देखील उल्हासनदी मध्ये जाणार नाही याची काळजी घेण्याचे लेखी आश्वासन दिले असल्याने उल्हासनदी प्रदूषणाचा विषय सध्यातरी सुटला आहे.

          लब्धी गार्डन्स हा रहिवाशी प्रकल्प नेरळ पासून चार किमी अंतरावर उल्हासनदीच्या  किनारी दहिवली गावाजवळ साधारणता दहा एकरमध्ये बांधण्यात आला असून सद्य स्थितीत पाच फेज मध्ये 500 कुंटूंब याठिकाणी स्थायिक होणार आहेत. 500 कुटूंबिय म्हणजे अंदाजे 2500-3000 लोकसंख्या नव्याने रहायला येऊ शकते . सदर प्रकल्प बारमाही वाहती असलेल्या उल्हासनदीच्या पात्रापासून हाकेच्या अंतरावर असून या रहिवाशी संकूलातील सांडपाण्याचा प्रश्न येथील स्थानिक रहिवाशी म्हणून ही गंभीर बाब आम्हाला वाटत आहे. कारण, हे सांडपाणी उल्हासनदीत सोडण्याचा प्रयत्न लब्धी गार्डन्स या विकासकाकडून सुरू आहे. दहिवली गावापासून ते नदिपर्यतची सर्व जागा ही लब्धी गार्डन या विकासकाने व्यावसायिक दृष्टीकोनातून त्या जमिनीवर गृहप्रकल्प उभा केला जात आहे.

         पुर्वी या संकूलालगत एक नैसर्गिक ओढा होता जो शेती आणि गावातील गोळा होणारे पावसाच्या पाण्याचा निचरा नदिपात्रात वाहून नेत होता. पंरतू, आता या ओढ्याच्या अर्ध्या भागात संरक्षण भिंत बांधली असून तो अरूंद करण्यात आला आहे. तसेच संकूलातील सांडपाण्याला वाट करून देण्यासाठी दोन मोठ्या भुमिगत पाईपलाईन टाकल्या असून संकूलातील सांडपाणी या ओढयात सोडले जाणार असून पुढे ते पाणी ओढया मार्गाने नदित मिसळणार आहे.पावसाच्या पाण्याच्या आडून हे सांडपाणी ग्रामिण भागातील जनतेच्या पाण्यात विरजणच असणार आहे. सदर बाब अतिशय गंभीर असून कोणतेही नियमांचे पालन न करता हा प्रकार सुरू असून आपण या विषय आपल्या निदर्शनास आणण्याचा प्रयत्न तक्रारकर्ते केशव तरे यांनी केला आहे.आजघडीला या नदिमुळे जवळपास 48 गावांना पिण्याच्या पाण्याचे  एकमेव साधन असताना जर हे सांडपाणी नदीमध्ये सोडले तर बारमाही वाहती नदी दूषित होऊ शकते. असे असताना आज कर्जत-नेरळ परिसरात नदिकिनारी सुरू असलेले रहिवाशी संकुल नदिचे आकर्षण दाखवून ग्राहकांना आकर्षित करत असून कालांतराने या नैसर्गिक स्त्रोताचीही विदारक अवस्था होण्यास विलंब लागणार नाही.

           लब्धी गार्डन्स या विकासकाने संकुलातील सांडपाणी पाईपलाईनव्दारे ओढ्यात सोडून तो पुढे नदिला मिळणार अशी व्यवस्था करत कायदा हातात घेऊन नैसर्गिक स्त्रोत दुषित करण्याचा डाव असून तो वेळीच थांबला पाहिजे अशी मागणी केली आहे. कायदयानुसार नदिपात्रालगत जे रहिवांशी अथवा बांधकाम होत आहे त्यांच्या सांडपाण्या व्यवस्था ही अंतर्गत असावी हा नियम आहे. उल्हासनदी प्रदुषणाबाबत सध्या सर्व स्तरावर विविध अभ्यास सुरू असून बदलापुर-अंबरनाथ-वालधुनी या ठिकाणी नदिची जी गंभीर अवस्था झाली आहे त्यावर अनेक रिसर्च सुरू असून ती कशी स्वच्छ करता येईल यावर एकिकडे शासनाकडून विविध उपाययोजन राबविल्या जात आहेत. 













केशव तरे - माजी अध्यक्ष महात्मा गांधी तंटा मुक्त गाव समिती 

 आमचे एकमेव पाण्याचे साधन असलेली नैसर्गिक संपदा म्हणून उल्हास नदि असताना ती दुषित करण्याचा जो डाव आहे तो विकासकाने वेळीच थांबवावा तसेच प्रत्येक नागरिकांने, तरूणांनी आपल्या आजूबाजूला जागृकतेने लक्ष ठेवून असे प्रकार निदर्षणास आणले पाहिजेत. आम्ही या संदर्भात पत्र पाठवून संबंधित विभागास तक्रार केली आहे, अपेक्षा आहे की यावर वेळीच योग्य ती कारवाई करून हा प्रकार थांबविला पाहिजे. 



















विकास जैन -संचालक,लब्धी गार्डन 

आम्ही आमच्या प्रकल्पात सांडपाण्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प तयार केला आहे. आमच्या सोसायटी मधील एक लिटर पाणी देखील आम्ही बाहेर सोडत नसून पाच लाख लिटर क्षमता असलेला हा प्रक्लप कर्जत तालुक्यातील एकमेव प्रकल्प आहे. दुसरीकडे आमच्या येथे केवळ १०० कुटुंब राहत आहेत. त्याचवेळी सर्व 500 कुटुंब राहायला आली तरी एक थेम्ब पाणी बाहेर सोडले जाणार नाही  दिली आहे. दुसरीकडे ज्या उल्हासनदीमध्ये पाणी सोडले असा गैरसमज गैरसमज केला जात असून आम्ही देखील त्याच उल्हासनदीचे पाणी पितो मग तेथेच कसे काय सांडपाणी सोडणार? सध्या आम्ही प्रक्रिया केलेले पाणी  बगीचा आणि बांधकामासाठी वापरत आहोत. 


अवश्य वाचा