पनवेल,

         रिक्षा चोरी करणार्‍या दोन तरुणांना तुर्भे पोलिसांनी गजाआड केले असून त्यांच्याकडून जवळपास 4,40,000/- रुपये किंमतीचा माल हस्तगत केला आहे.

        तुर्भे पोलीस ठाणे परिसर तसेच देवनार पोलीस ठाणे परिसरातून रिक्षा चोरी केल्याच्या घटना घडल्या होत्या. या संदर्भात तुर्भे पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार बळीराम जाधव व पोलीस नाईक वळवी यांच्या पथकाने सदर आरोपींचा शोध घेत असताना आरोपी अब्दुल रहेमान खान व अली शकील अहमद शेख या दोघांना ट्रॉम्बे मुंबई येथून ताब्यात घेवून पोलिसी खाक्या दाखविला असता त्यांनी चोरी केल्याचे कबूल केले असून त्यांच्याकडून चोरीच्या दोन रिक्षा हस्तगत करण्यात आल्या आहेत. याबाबत पुढील तपास पोलीस हवालदार बळीराम जाधव करीत आहेत.

अवश्य वाचा