मुरुड जंजिरा 

         कोकण किनारपट्टीला २ दिवस वादळी वारे  व सोसाट्याचा वारा येणार ह्या हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला .मुरुडला सकाळी ११ च्या सुमारास जोरदार वारा व पाऊस सुरु जाहला थोडावेळ असणाऱ्या ह्या पाऊसाने मुरुडकर धास्तावले .आधीच २ दिवस लाइटींनी सतत गुल होऊन मुरुडकरांना बेजार केले होते त्यात हे वादळ काहीकाळ सर्वच घाबरले होते. 

      मुरुड खोरा  बंदरात आज सकाळी वाऱ्यासोबत लाटांचे तांडव पाहायला मिळाले .नवीनच झालेल्या खोरा जेटीवर २० फुटी लाटा जोरदार धडकत होत्या .समोरच जंजिरा किल्ला आहे .येणाऱ्या लाटा किल्ल्याच्या बुरुजापर्यंत उंची गाठत होत्या .डाव्याबाजूला राजपुरी गाव आहे .गावच्या तटबंदीला लाटांचे तांडव सहन करायला लागत होते.

            शासनाच्या आदेशानुसार कोळी बांधवांची १ काही बोट समुद्रात गेली नाही .सर्व बोटी अगरदांडा खाडीत विसावल्यात पूर्णपणे सुरक्षित आहेत .वादळाचे स्वरूप काहीकाळच होते .नाहीतर मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागले असते 

अवश्य वाचा