कर्जत- दि.12 

                कर्जत नगरपरिषद हद्दीतीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते  श्री कपालेश्वर मंदिर या रस्त्यावरील अनधिकृत फेरीवाल्यांवर नगरपरिषदेने कारवाई  केली आहे, आता रस्त्याने मोकळा श्वास घेतला आहे. 

              हा रस्ता नगरपरिषदेने नो हॉकर्स झोन म्हणून काही वर्षा पूर्वी जाहीर केला होता तसा ठराव नगरपरिषद मध्ये आहे, नगरपरिषद प्रशासन आणि लोकप्रतिनिधीच्या कृपेने रस्त्याच्या दोन्ही बाजूला फेरीवाल्यांनी बस्तान मांडले होते. या फेरीवाल्यांच्या पसाऱ्याने रस्तावरून येणाऱ्या -जाणाऱ्या वाहन पादचारी यांना अडचण होत होती याबाबत नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी केल्या होत्या मात्र नगरपरिषद प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत होते.

             मात्र काल दि.11जून रोजी नगपरिषदेच्या अतिक्रमण हटाव पथकाने कारवाई करून रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या फेरीवाल्यांना उठवले आहे, मात्र ही कारवाई किती दिवसासाठी राहणार असा प्रश्न या परिसरातील नागरिक विचारत आहे. हे फेरीवाले ही जागा आपल्याच मालकीची आहे या भावनेतून वर्षोनुवर्षे याठिकाणी पसारा मांडून बसत आहेत. या मधील अनेक फेरीवाल्यांनी दुकानाचे गाळे घेतले आहेत. ते गाळे अन्या व्यापा-याला भाड्याने दिली आहेत अशी माहिती मिळाली. तर या रस्त्यावरील काही दुकानदार या फेरीवाल्यांकडून दिवसाचे भाडे घेत आहेत.म्हणजे रस्ता नगरपरिषद मालकीचा भाडे घेतो दुकानदार अशी परिस्थिती आहे.

             या सिस्टीम मागे खूप मोठी साखळी आहे तिचा शोध नगरपरिषद प्रशासनाने घेतला पाहिजे म्हणजे खरे सूत्रधार समोर येतील. बघू या नगरपरिषद प्रशासनाची ही करावाई किती दिवसापर्यत राहते 

अवश्य वाचा