कर्जत - दि.12 

            कर्जत तालुक्यातील कोथळीगडावर सापडलेल्या ब्रिटीश बनावटीच्या तोफेला सह्याद्री प्रतिष्ठानच्यावतीने तोफागाडा बसवून तोफेला नवीन संजीवनी देण्यात आली आहे.     

               कर्जत पासून अवघ्या 40 किमी अंतरावर असलेल्या कोथळीगड उर्फ पेठ किल्ला या गडावर आजवरच्या इतिहास अभ्यासक संशोधक यांनी लिखाण केलेल्या गडाच्या इतिहासात दोन तोफांची नोंद आहे त्यातील एक तोफ गडाच्या माचीवरील पेठ या गावात लहान उखळी तोफ आहे तर गडावर दुसऱ्या प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यावर दुसरी 6.5 फुट लांबीची तोफ होती, अशी नोंद मिळते. बऱ्याच इतिहास अभ्यासकांनी गडावर तिसरी तोफ नाही असे सांगितले.

              कोथळीगडाच्या इतिहासाच्या आधारे या गडाचा मराठी इंग्रजी कागदपत्रातून तसेच मुघली कागद पत्रातून एक बलाढ्य संरक्षण ठाणे होत आणि मराठ्यांचे या गडावर शस्त्रागार होते. संभाजी महाराजांच्या काळात या गडाला विशेष महत्व आले होते पुढे पेशवे काळातही हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात होता तर 1818 मध्ये इंग्रजांनी हा किल्ला जिंकून याच्या वास्तूची तोडफोड केली.
सह्याद्री प्रतिष्ठानने 

#   दि.17फेबुवारी 2019 रोजी गडावर असलेल्या तोफेला पुरातत्व निकषाने तोफगाडा तयार करून त्यावर तोफ बसविण्यात आली. 

#   10 मार्च 2019 रोजी स्थानिक गावकऱ्याच्या मदतीने सह्याद्री प्रतिष्ठानच्या सदस्यांनी तोफेचा शोध घेतला असता. तेव्हा गडाच्या दुसऱ्या प्रवेशद्वाराच्या 100 फुट खाली एका भल्या मोठ्या दगडाखाली मातीत बुजलेली 4.5 फुट लांबीची तोफ सापडली.

#   दि.7 एप्रिल 2019 रोजी सह्याद्री प्रतिष्ठान कर्जत विभागाने मोहिमेची तयारी केली आणि संस्थेचे संस्थापक श्रमिक गोजमगुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहिमेचे नियोजन झाले. या तोफेला मातीतून  बाहेर काढून दोराच्या साह्याने 100  फुट वर असलेल्या प्रवेशद्वार पासून जवळ असलेल्या सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले. जवळपास 5 तास संस्थेच्या 60 सदस्यांनी भर उन्हात श्रमदान करून या तोफेला नवी संजीवनी दिली आहे. आजवर कोथळी गडावर दोन तोफा होत्या परंतु गावकऱ्यांनी दिलेल्या माहितिचा शोध घेऊन तोफेचा शोध घेऊन इतिहासापासून लुप्त झालेल्या तोफेला उजाळा मिळाला त्याबद्दल श्रमिक गोजमगुंडे यांनी गावकऱ्यांचे आभार मानले. तसेच पुरातत्व विभागाने केलेल्या सहकार्य बद्दल ही आभार व्यक्त केले. अशी माहिती कर्जत विभाग अध्यक्ष सुधीर साळोखे यांनी दिली.

# दि.9 जून रोजी लोकवर्गणीतून सह्याद्री प्रतिष्ठान कर्जत विभागाने दि.10 मार्च रोजी सापडलेल्या तोफेलाहि लाकडी तोफगाडा बसविला व सोबत गडाच्या पायथ्याशी असलेल्या पेठ गावातील लहान युरोपिन पद्धतीच्या तोफेलाहि त्या पद्धतीचाच तोफगाडा बसविला.

दुर्गापन सोहळा- 9 जून 2019 रोजी तोफगाडा दुर्गापन सोहळा सकाळी पार पडला सकाळी ढोल गाजरात मान्यवरांचे स्वागत झाले शिवरायांच्या मूर्तीचे पूजन झाले सर्व मान्यवरांनी गडावरील तोफेची पूजा करून त्यांनी तोफगाडा अनावरण केले. दुपारी गड पायथ्याशी तीन शाहीर रायगड भूषण वैभव घरत, गणेश ताम्हणे आणि पोलीस दलातील शाहीर होते. शाहिरांनी गडकिल्ले संवर्धनाच्या पोवाड्याने संपूर्ण वातावरण हि शिवमय केले. 

                 हा सोहळा सरसेनापती येसाजी कंक यांचे वंशज सिद्धार्थ कंक, श्रीमंत साबूसिंग यांचे वंशज दिग्विजयसिंग पवार,सरदार मानाजी पायगुडे यांचे वंशज राजकुमार पायगुडे, मंगेश दळवी, अमोल जाधव यांच्या  हस्ते संपन्न झाला. सिद्धार्थ कंक यांनी आपल्या वंशजांच्या पराक्रमाची माहिती देत सह्याद्री प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतुक केले, शिवरायांच्या गडकोटक हे आता उजळू लागत आहे असे सांगूनश्रमिक गोजमगुंडे यांनी उभी केलेली चळवळ आणि कार्य हे महाराष्ट्रभर पोहचत आहे. या पुढील कार्यात माझी उपस्थित सह्याद्री प्रतिष्ठानसोबत राहील असे सांगितले. 

             मंगेश दळवी म्हणाले कि आज माझ्या जीवनातील सर्वोच्च दिवस आहे कि माझ्या दातृवाने लहानसा योगदान मी या तोफगाडे साठी देऊ शकलो आणि मला आज हा सोहळा पाहून शिवकाळात गेल्या सारखे वाटते या पुढे मी सह्याद्रीचा सेवक म्हणून आपल्या सोबत काम करेन.

स्थानिक ग्रामस्थ किरण जाधव  यांनी सह्याद्री प्रतिष्ठानमुळे किल्ल्याच्या संवर्धनाला वेग आहे अनेक पर्यटक किल्ल्याला भेट देत असतात पण आता तीन तोफांना तोफगाडे बसल्यामुळे किल्ल्याला ऐतिहैसिक स्वरूप येत आहे. आम्ही सर्व ग्रामस्थ सह्याद्री प्रतिष्ठानचे मनापासून आभार मानतो.

           संस्थेचे संथापक  श्रमिक गोजमगुंडे यांनी मान्यवरांचे आभार मानले. तसेच कर्जत विभाग अध्यक्ष यांनी येत्या काही महिन्यात कर्जत विभागाकडून कोथळी गडाच्या दरवाजाला पुरातत्व निकषाने सागवानी कवाड (दरवाजा) बसविण्यात येईल असे सांगितले.यावेळी  शिवप्रेमीं मोठ्या संख्येने उपस्थित होते.


अवश्य वाचा