कर्जत - दि.12 

            कर्जतच्या शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या टेकडीवर ॐ निसर्ग मैत्री भ्रमंती परिवार कर्जत आणि माॅर्निंग वाॅकला येणा-या नागरिकांनी वृक्षारोपण केले. दरवर्षी वृषारोपण करण्यात येते विशेष म्हणजे लावलेली सर्व झाडे ही मंडळी जगवतात.

           यावेळी वड, पिंपळ, उंबर, चिंच, आवळा, आंबा, जांभुळ, काजु, शिसव, करंज आदिंची 50 झाडांची लागवड करण्यात आली. ॐ निसर्ग मैत्री भ्रमंती परिवार कर्जत यांच्यावतीने  राजू पोतदार यांनी सर्व झाडे दिली तसेच माॅर्निंग वाॅकला येणाऱ्या बहुतांश नागरिकांनी  प्रत्येकी 500/- रक्कम त्या झाडांच्या वर्षभराच्या देखभालीसाठी जमा केली.  या कार्यक्रमात राजू पोतदार, दिलीप कदम, महेंद्र चंदन पाटील, पी, के. देशमुख, जयंत पाटकर, संदिप शिंदे, वकिल राजेंद्र निगुडकर, सोनाली गरवारे, रामकुमार गुप्ता, श्रीकांत ओक, अशोक शितोळे, विहंग परब, श्री. मते, श्रीकांत मनोरे, निलेश अत्रे,पंछी गुप्ता,मनोज वरसोलीकर, दिलीप सावंत तसेच मोठ्या प्रमाणात पुरुष, महीला व लहान मुले सहभागी झाली.

         गेली काही वर्षे इथे मोजकीच झाडे लावून त्या झाडांना पाणी घालून त्यांचे संवर्धन या ग्रुपच्या माध्यमातून केले जाते. यामुळे ही टेकडी हिरवीगार होऊ लागली आहे. प्रतिवर्षी मोजकीच झाडे लावून त्यांचे संवर्धन करण्याचा असा सामाजिक उपक्रम सर्वत्र राबविल्यास वाढत्या तापमानाला आळा बसेलच तसेच पाण्याचे दुर्भिक्ष कमी होऊन पर्यावरण रक्षणार्थ मदतही होईल असे वृक्ष प्रेमीचे म्हणणे आहे.

अवश्य वाचा