पाताळगंगा २० ऑगस्ट,
श्रावण महिन्याचे अगमन झाल्यापासून बळीराजामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.यामुळे बळीराजा श्रावण महिन्यात सुद्धा शेतीच्या कामाकडे व्यस्त असल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे.श्रावण महिन्याचा हा तिसरा सोमवार असून देव देवतांच्या विविध मंदिरामध्ये टाळ, मृदंगाचा गजर ऐकू येत असतो.त्याच बरोबर भजन, प्रवचन व कीर्तन असे अध्यात्मिक कार्यक्रमही सुरू असतात.
परंतू वाढत्या लोकसंख्येच्या अन्नधान्याची गरज भागविण्यासाठी अन्नधान्य उत्पादन वाढविणे गरजेचे असून, ऊन-पाऊस याची तमा न बाळगता वर्षभर शेतात राबणारा बळीराजा महिन्यात ठराविक असे दिवस शेतातील काम बंद ठेऊन वार पाळून अध्यात्म करत आहे. ही परंपरा फार वर्षापासूनची आहे. पीक पाणी चांगले बहरून यावे, सृदृढ आरोग्यप्राप्ती लाभावी, मानसिक व अध्यात्मिक विकास व्हावा, यासाठीच बळीराजा वार पाळून श्रावण मासात अध्यात्म करताना दिसत आहे.
अन्न, वस्त्र आणि निवारा या तीन मानवाच्या मुलभूत गरजांपैकी धान्य पिकविण्याची जबाबदारी ही बळीराजावर अवलंबून असते.त्याच्या कामापासून थोडा वेळ तरी सुटका मिळावी, म्हणून ग्रामीण भागातील शेतकरी वार पाळून विश्रांती घेताना दिसत आहे.मातीशी जुळलेल्या नात्यामुळे व पिकांच्या संरक्षणासाठी बळीराजाला मात्र विसावा मिळतच नाही.
मात्र या दिवशीही शेतकरी बैल जोडिविना शेतात काम करतात. काही सणा दिवशीही शेतकरी शेत कामात मग्न असलेले चित्र पाहावयास मिळत आहे.रोज शेताला जाणे, जनावरांना धुणे-पोसणे, चारा आणणे, चार्याची साठवणूक करणे. शिवारात मशागत करणे, पिकांची जोपासना करणे व धान्य साठवणूक करणे अशा कामाचे चक्र कायम सुरू असते. यामध्ये कधी वर्ष संपते अन् दुसर्या वर्षाला प्रारंभ होतो याचा शेतकर्यांना पत्ताच लागत नाही.
Copyright © 2019 कृषीवल. Maintained By Initialize Group