खालापूर

   तालुक्यातील वावोशी ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक १  मध्ये अनुसूचीत जमाती या प्रवर्गासाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी शुक्रवार दि.६ जुनला राष्ट्रवादीकडून संतोष चंदर वाघमारे तसेच शिवसेना-भाजपा युतीचे उमेदवार माजी जि.प.सदस्य व माजी सरपंच  रामा बाळू वाघमारे यांनीही उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र सोमवार दि.१० जुनला रामा वाघमारे यांनी उमेदवारी माघारी घेण्याबाबत अर्ज दिल्याने ही चुरशीची ठरणारी निवडणूक बिनविरोध झाली आहे. दरम्यान अर्ज छाननी प्रक्रियेत वरील दोन्ही उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. यावेळी राजिपचे आरोग्य, शिक्षण व क्रिडा सभापती नरेशजी पाटील, माजी सरपंच वालचंदजी ओसवाल, राजू शहासने, गणेश मोरे, रविंद्र भालेराव, जनार्दन मोरे, मारुती नाईक आणि सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

वावोशी ग्रामपंचायतीवर भाजपाचे कमळ फुलवणारे माजी सरपंच व भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी वालचंदजी ओसवाल यांनी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने प्रभाग क्रमांक १ मधील (मयत) सोन्या वाघमारे यांचे  भाजपाचे रिक्त असलेले पद कोणाकडे जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले असताना भाजपचे कार्यकर्ते व माजी जि.प.सदस्य राम वाघमारे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने पोटनिवडणूक चुरशीची होणार होती परंतू वालचंदजी ओसवाल आणि राजू शहासने यांचे कसब व प्रभाग क्र. १ मधील भिमनगर व दांडवाडी, बुरमाटवाडी, पिंपळवाडी येथील ग्रामस्थांनी संतोष वाघमारे यांना दिलेला एकमुखी पाठिंबा यांच्यापुढे माजी जि.प.सदस्य राम वाघमारे यांना अखेर माघार घ्यावी लागली व ही पोटनिवडणूक बिनविरोध ठरली. अशा प्रकारे वरिल रिक्त पद राष्ट्रवादीच्या ताब्यात आल्याने एकूण ७ सदस्य असलेल्या वावोशी ग्रामपंचायतीमधील सरपंच पद वगळता राष्ट्रवादीचे १ उपसरपंच व ४ सदस्य असे राष्ट्रवादीचे निर्विवाद बहुमत सिध्द झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या बिनविरोध ठरलेल्या निवडणूकीत दांडवाडी, बुरमाटवाडी, पिंपळवाडी, भिमनगर येथील ग्रामस्थ यांचा मोलाचा वाटा आहे असे माजी सरपंच राजू शहासने यांनी प्रतिनिधींशी बोलताना सांगितले. या सर्व प्रक्रियेत वालचंदजी ओसवाल, राजू शहासने, रामा बुवा, उपसरपंच सुनिता भालेराव, ग्रामपंचायतीचे सदस्य सतिश दरेकर, भारती नाईक, गणेश मोरे, रविंद्र भालेराव, राकेश शिर्के, पुरुषोत्तम मोरे, जनार्दन मोरे, मारुती नाईक, राजू आढावकर, महेश गुरव, संदीप भऊड, चरण उदेकर आणि सर्व कार्यकर्ते व ग्रामस्थ यांचे महत्त्वाचे योगदान लाभले.

अवश्य वाचा