रोहा ( वार्ताहर ) बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांना ग्रामीण कृषी अनुभव मिळावा यासाठी कृषीभूषण गट कार्यरत आहे. या गटाच्या वतीने वावे पोटगे येथील शेतकरी बांधवांना विविध योजनांची माहिती देण्यात आली.
 
शेतकऱ्यांना केंद्राच्या व राज्याच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. यामध्ये पिक विमा,यांत्रिकीकरणावरील अनुदान, शेततळे, रोजगार हमी योजना या योजनांची माहिती दिली. कृषी सहाय्यक पी ए देशमुख ,मिनल शिंदे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. याप्रसंगी सरपंच राम गिजे,उपसरपंच प्रतिभा म्हात्रे,ग्रामपंचायत सदस्य प्रगती ठाकूर,हर्षदा घाणेकर तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

अवश्य वाचा