मंगळवेढा प्रतींनिधी :-सोलापूर जिल्हा विधानपरिषद सदस्य प्रशांतराव परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार प्रशांतराव परिचारक संयोजन समिती मंगळवेढा यांच्या वतीने दि.23/08/2019 रोजी शिवप्रेमी चौक मंगळवेढा येथे प्रथमच भव्य व खुल्या प्रो कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, कबड्डी खेळाडूंनी व कबड्डी चाहत्यांनी या स्पर्धेचा लाभ घ्यावा असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

 

ग्रामीण भागात प्रो-कबड्डी स्पर्धेचे आयोजन करून या खेळाची माहिती व प्रसार व्हावा या उद्देशाने सदर च्या प्रो-कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवेढा या दामाजीपंतांच्या भूमीमधून अनेक खेळाडूंनी विविध क्षेत्रात आपले नावलौकिक कमविलेले आहे. मात्र, प्रो-कबड्डी या खेळासही भरपूर वाव असल्याने या खेळाची माहिती,नियम,व खेळ या भागातील खेळाडूंना व क्रीडा प्रेमींना माहिती व्हावा व या खेळाचा अधिकाधिक प्रसार व्हावा म्हणून सोलापूर जिल्ह्याचे आमदार प्रशांतरावजी परिचारक (मालक) यांच्या वाढदिवसानिमित्त शिवप्रेमी चौक आठवडा बाजार,मंगळवेढा येथे शुक्रवार दिनांक २३/०८/२०१९ रोजी सकाळी ठिक १० वाजता भव्य प्रो कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

 

     या स्पर्धेचे उद्घाटनसोलापूर जिल्ह्याचे पालकमंञी ना.विजयकुमार देशमुख (मालक) यांच्या हस्ते व माजी पालकमंञी प्रा.लक्ष्मणरावजी ढोबळे सर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहेसदर च्या स्पर्धे करीता प्रमुख उपस्थिती युटोपीयन शुगर्सचे चेअरमन उमेशराव परिचारक व जिल्हा परीषद सदस्य वसंतनाना देशमुख यांची प्रमुख उपस्थिती लाभणार  आहे.

 

या स्पर्धेकरीता पुढील प्रमाणे बक्षिसे ठेवण्यात आलेली आहेत.

 

प्रथम  : रुपये २१,,११/- व सन्मानचिन्ह   मा.शिवानंद पाटील माजी सभापती शिक्षण व                                           आरोग्य जिल्हा परिषद, सोलापूर

द्वितीय  : रुपये ११,,११/- व सन्मानचिन्ह   मा.संतोष कोंडूभैरी, श्री समर्थ डेअरी, मंगळवेढा.

तृतीय  : रुपये ७,,११/- व सन्मानचिन्ह    मा.डॉ.शरद शिर्के,शिर्के मॅटर्निटी होम, मंगळवेढा

चतुर्थ   : रुपये ५,,११/- व सन्मानचिन्ह    मा. राहुल ताड, युवक नेते, मंगळवेढा  

अवश्य वाचा