रायगड जिल्ह्यातील आदिवासींवर होणार्‍या अन्याया विरोधात गुरुवार दि. 13 जून रोजी श्रमजिवी संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.
रायगड जिल्ह्यातील पनवेल, उरण, खालापूर, कर्जत, सुधागड या तालुक्यातील आदिवासींवर होत असलेल्या अन्यायाचा निषेध करण्यासाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय राज्य घटनेच्या भाग चार अनुच्छेद 46 मधील मार्गदर्शक तत्वानुसार आदिवासींचे सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, हितसंवर्धन करण्याची जबाबदारी ही राज्य सरकारची आहे. मात्र आदिवासींवर अन्यायच होत आहे. कोकण आयुक्त यांनी दि. 17 मे 2018 रोजी सर्व समस्यावर योग्य ती कार्यवाही करण्याचे लेखी आदेश दिले आहेत. केवण रेशनकार्ड देण्याशिवाय इतर एकही प्रश्‍नावर कार्यवाही झालेली नाही. राज्यपाल व मुख्यमंत्री यांच्या आदेशाप्रमाणे ’कातकरी उत्थान अभियान’ अंतर्गत कातकरी व ठाकूर आदिवासींच्या समस्यांवर त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश असताना आपल्या कार्यालयाकडून कोणतीही कार्यवाही होत नाही, असे श्रमजीवि संघटनेने रायगड जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. दि. 13 जून रोजी माजी आमदार, संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली मोर्चाचे आयोजन केलेले आहे. 

मागण्या 
मसुदा भारतीय वन कायदा 2019 मधील जाचक अटी, कोकण आयुक्त यांच्या आदेशातील समस्या त्वरित सोडविण्याबाबत, आदिवासींच्या घराखालील जागेच्या प्रश्‍न, रेशनिंग समस्या, वन व दणी जमिनी, आदिवासी वाड्यांना नागरी सुविधा, जिल्ह्यातील पोलिसांचा आदिवासींवरील अन्याय, जिल्ह्यातील अनुसूचित क्षेत्र संबंधित प्रश्‍न व इतर मागण्या.

अवश्य वाचा