मित्र, सखा,भाई, सोबती अशी ज्याची अनेक विशेषणे आहेत असा महाडच्या नागेश्री खोऱ्यातील एक दिलदार मित्र मंगेशभाई सर्वोची साथ सोडून परलोकी निघून गेला... नातं जपणारा सच्चा मंगेशभाई धाडवे सर्वांना दुःखाच्या सागरात सोडून गेला.. मनी होता भोळेपणा नाही दाखविला कधी मोठेपणा ..कष्टाने केली आयुष्याची सुरुवात.. सुख जवळ येताच का फिरवली पाठ..

सर्वसमावेशक व्यक्तीमत्वाला अखेरचा सलाम ...

महाड तालुक्यातील खुटील मुळगांवचे स्व.मंगेश भाई धाडवे म्हणून जनमानसात लोकप्रिय असलेले व्यक्तिमत्व ६ जून २०१९ ला काळाच्या पडद्याआड गेले... भाई तुम्ही या जगात नाही हे पचवन थोड जड जातंय... कोणत्याच संकटात तुम्हाला डगमगताना पाहिले नाही.. तुम्ही कधीच रडल्याचेही आठवत नाही.. पण तुमच्या जाण्याने गावातील व पंचक्रोशीला अश्रू आवरणे आता कठिण जात आहे..भाई, तुम्ही नसला तरी तुमची शिकवण कायम राहिल.. तुम्ही पेरलेल्या विचारांपैकी आम्ही आता गावचा व गावाच्या माणसांचा विसर कधीच पडू देणार नाही.....

       मंगेश भाई धाडवे हा एक उत्तम कलाकार होता.तो असा एक नट होता की त्याची पडद्यावर एंट्री झाल्यावर प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर कायम हास्य यायचं.भाई आला आहे आणि त्यांची ठरलेली भूमिका म्हणजे तो आपल्याला हसवणार असं प्रेक्षकांनी त्याला गृहीतच धरलं असायचं. प्रेक्षकांनी त्याला असं गृहीत धरणं हीच मंगेशभाई या नटाची सगळ्यात मोठी खासियत होती.पण दुदैव म्हणजे वेगवेगळ्या व्यक्तीमत्वाचे प्रयोग करण्यायी त्याच्याकडे उत्तम क्षमता असून देखील त्याचे गाजलेले नाट्यप्रयोग तालुक्याबाहेर गेले नाहीत, परंतू गावातील आणि पंचक्रोशीतील असंख्य प्रेक्षकांच्या मनावर त्यांनी मात्र आपल्या उत्तम अभिनयाने अधिराज्य गाजवले ' त्यातील लोकप्रिय असे ' लपड्यात पाय ' या गाजलेल्या नाटकांचे दिग्दर्शक बबन धाडवे यांनी केले होते तर प्रमुख भूमिकेत मंगेशभाई यांनी नोकराची भूमिका केली होती, आणि नाटकांतील इतर भूमिका मध्ये सुनील भुवड, संजय (आण्णा) धाडवे, योगेश आंबेकर, राजू विष्णू धाडवे, विनायक आंबेकर, दिलीप येळकर, नितीन निंबरे आदींनी भाग घेतले होते. अनेक वर्षे लोटली परंतू आजही या नाटकांनी अनेकांना जवळ केले.. मंगेश भाई हा खरं तर एक बुद्धिमान माणूस होता.निसर्गावर प्रेम करणारा, ट्रेकिंगची आवड असल्याने गावातील अनेक निसर्गाच्या सानिध्यात फिरायला जात असे..मागील वर्षी त्यांनी महाड येथील बिरवाडी ठिकाणी मिरची लागवडीतून उत्पन्न कसे वाढवावे हेही सिद्ध केले होते.नंतर मुंबई सारख्या महानगरीत छोटे मोठे व्यवसाय करून सर्व मित्रांना जवळ केले होते.गावात छोटे छोटे रोपटे लावून वनश्री फुलविण्याचा संकल्प त्यांनी केला होता. मंगेश भाईचा स्वभाव बोलका, मर्मविनोदी पण तेवढाच धीरगंभीर.त्याचे विनोद इतरांना खऴखऴा हसायला लावणारे.अनेक ठिकाणी त्यांनी नातेवाईक जपले होते,त्याचे व्यक्तीचित्रण आणि निरिक्षण तर कमालीचे परफेक्ट होते.तो ग्रुपमध्ये असला की सगऴे मनमोकऴे हसल्याशिवाय रहात नाहीत.. इतरांना निखऴपणे हसवतो.पण इतरांना हसवणाऱ्या त्याच्या धाडवे कुटुंबाच्या डोळ्यांत मात्र दु:खाचा डोह भरलाय.भाईच्या जाण्याने सर्व धाडवे परिवारात व गाव कारभारात नक्कीच मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

            मुंबई येथील दिवा येथे मंगेश भाई आणि कुटुंब राहत होते, त्यानंतर काही वर्षांनी विद्याविहार येथे राहण्यास गेले, दिवा येथे राहत असताना अनेक नातं जपलं होतं, स्वतःमंगेशभाई आणि त्यांची पत्नीस्वाती काकींनी सर्वांना आपलसं केलं होतं,कधी नातेवाईक गावातील लोक त्यांच्या घरी आल्यावर चहापाणी जेवणाची व्यवस्था करत होते, प्रत्येक क्षेत्रांत आवड असणारा मंगेश भाई अनेकांमधून एक होता,रोहन आणि रोहित हे जुडवा मुले त्यांना आहेत, त्यांनाहीं मंगेशभाई सारखी कला प्राप्त झाली आहे, मंगेशभाई स्वतः गावातील चाळीतील सांस्कृतिक कार्यक्रमा मध्ये आपली कला सादर करत होते,त्यांची ओळख घेऊनच मुलेही वडिलांसारखी कला जोपसत आहेत, रोहन - रोहित दोघेही हुशार आहेत, मंगेशभाई यांनी मुलांच्या बाबतीत चांगल्या शिक्षणासाठी नेहमीच धडपडत असायचा, त्यांच्या साथीला त्याची पत्नीही छोटीशी नोकरी करत होती, दोघेही समन्वय साधणारे जोडपे होते,मंगेश भाईनीं मुलांना चांगली शिकवण दिली आहे, मंगेशभाई कुणाला उदास, हताश किंवा नाराज दिसला नाही.नेहमी हसत हसवत राहणारा मंगेश भाई गेल्यावर रडताना पूर्ण कुटुंब,गाव आणि नातेवाईक पाहिलं..आता तर खरी गरज होती सर्वांना तुमची, तुमच्या लहान लेकरांना म्हणजे रोहन - रोहीत, स्वाती काकींना, आई वडिलांना, भावांना,धाडवे कुटुंबाला, पूर्ण मित्रपरिवाराला तुमची अन तुमच्या मार्गदर्शनाची खरी गरज होती, तुम्ही तुमच्या कर्तृत्वाने आकाशही ठेंगणे करून ठेवलं होतं मग यमाला का नाही परत पाठवलं , मागे एकाकी पडलेल्या सर्वांना आता कोण आधार देणार, इतकी तीक्ष्ण बुद्धी कशी चालवत होते तुम्ही, सतत हसत खेळत फ्रेश राहूनही ह्रदयविकाराचा झटका येणे अन त्यात तुम्ही एक्झिट घेणे मन मानायला तयारच नाही, भाई असं अर्ध्यावरती सोडुन जाल असं स्वप्नात देखील वाटलं नव्हतं, तुमच्या असं अचानक जाण्याने सर्वाचे मन सुन्न झालंय. सर्वांच्या मनाला फार मोठा धक्का बसलाय, भाई असं नको होईला पाहीजे होते. शेवटी मात्र सर्वांना असच वाटतय की , देवा आमच्या सोबतच असं का करतोस जिवला जिव देणारा आमचा मंगेश भाई आमच्यापासुन हिरावुन का घेऊन गेलास ? असं का? भाई तुम्ही मुलाना असं पोरकं करून गेलात की सावरण अशक्य आहे,भाई तुम्ही कायम नेहमीच स्मरणात रहाल .मैञीच्या दुनियातील,हास्य विनोदी सम्राट मंगेशभाई धाडवे राजा माणुस हरपला...सहवास जरी सुटला, स्मृती सुगंध देत राहील, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आठवण मंगेश भाई तुझी येत राहील ..त्याला कायम गृहीत धरणाऱ्या प्रेक्षकांनी तो इतक्या तडकाफडकी जाईल असं कधीच गृहीत धरलं नव्हतं, त्यानं अजून थांबायला पाहिजे होत, अजून आम्हाला हसवायला पाहिजे होतं.. जे झालं ते तुम्ही आणि आम्ही कुणीही थांबवू शकत नव्हतो ती तर परमेश्वराची इच्छा होती आणि त्याने ती पूर्ण केली पण त्या देवाला मात्र आम्ही एवढंच सांगू की, " तुझ्या स्वर्गाचं दार उघडून ठेव. कारण आम्हा सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा आमचा विनोदसम्राट,आमचा मंगेश भाई येतोय... आता तुझा दरबार गाजवायला, तुलाही मनसोक्त हसवायला "...

आज माझा प्रत्येक शब्द ज्वालाकांड घडविणारा ठरो हीच तुझ्या मृतपाय भावनांना माझ्या जिवंत शब्दांची श्रद्धांजली...


अवश्य वाचा

....तोच खरा 'बालदिन'