रेडिअटर मधील पाणी आणि इंजिन ऑइल अंगावर पडल्याने सात जण भाजले.

यामध्ये २ पुरुष ३ लहान मुले व दोन महिलांचा समावेश आहे बोरघाटात अपघाताची मालिका सुरूच असून आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास पुण्यकडून मुबई कडे जाणारी मिनी बस अंडा पॉईंड जवळ ब्रेक फेल होऊन उलटल्याने भीषण अपघात घडला बस उलटी झाल्याने बसचा रेडिअटर फुटून सात जण गंभीर भाजल्याची घटना घडली यामध्ये 2 पुरुष, 3 लहान मुले तर दोन महिलांचा समावेश आहे,

या घटनेची माहिती मिळताच बोरघाट पोलीस व अपघात ग्रस्त टीमच्या सदस्यांनी तात्काळ घटना स्थळी दाखल होत बस मधील भाजलेल्या व्यक्तींना बाहेर काढून मदत केली आणि रुग्णवाहिकामधून तात्काळ जखमींना खोपोली नगरपालिका रुग्णालयात दाखल केले व पुढील उपचारासाठी मुबंई येथील रुग्णालयात हलविण्यात आहे, यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे

अवश्य वाचा