आज आपत्ती व्यवस्थापन शिबिर उरण नगर परीषद आणि नागरी संरक्षण दल उरण यांचे संयुक्त विद्यमाने मुख्याधिकारी आणि श्रीमती राजेश्वरी कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजीत करण्यात आले होते. 

सदर शिबिरामध्ये प्रशिक्षक सदर शिबिरामध्ये प्रशिक्षक म्हणून श्री. एम के म्हात्रे सहा. उपनियंत्रक , नागरी संरक्षण दल ह्यांनी आपत्ती पुर्वी -आपत्ती आल्यावर - आणि आपत्ती येऊन गेल्यावर आपली आधिकारी, कर्मचारी म्हणून भूमिका आभ्यासपूर्ण आसली पाहिजे हे प्रात्यक्षिकासह उत्तम मार्गदर्शन केले. यावेळी उरण नगरपरीदेचे मुख्याधिकारी अवधूत तावडे यांनीही मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नोडल ऑफीसर श्री संतोष पवार यांनी केले.

यावेळी उरण तालुका डाॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डाॅ. संजीव म्हात्रे , उरण पोलीस ठाण्याचे पोलीस आधिकरी श्री. चव्हाण , श्री . वाघ , कोळकर , पोलीस कर्मचारी , शहरातील मुख्याध्यापक श्री. भोये सर , श्रीमती. खेडकर मॅडम , शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच उरण नगर परीषद आधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

अवश्य वाचा