उरण तालुक्यातील कॉंग्रेस कामिटी विभागीय अध्यक्ष सदानंद पाटील यांचे वडील गोपिनाथ

गणपत पाटील यांचे वृद्धापकालाने शनिवार (दि. ८)जुन रोजी दुखःद निधन झाले .मृत्यु समयी

त्यांचे वय ९६ वर्षे होते .

त्यांच्या पश्यात तीन मुलगे सदानंद पाटील ,वासुदेव पाटील ,चंद्रकांत पाटील , ,दोन मुली

केशर पाटील ,व भानुमती थळे ,७ नातवंडे ,८ पणतू असा मोठा परिवार आहे .गोपिनाथ

पाटील यांचे दहावे सोमवार (दि. १७ )जून रोजी दांडा - श्री क्षेत्र माणकेश्वर येथे होणार असून

बारावे व तेरावे मंगळवार (दि. १८) रोजी राहत्या घरी केगाव उरण ,आवेडा येथे होणार आहे.

गोपिनाथ पाटील यांचा जनसंपर्क मोठा होता त्यांच्या अंत्य यात्रेत इंटक चे महेंद्र घरत ,मिलिंद

पाडगावकर ,रमेश टेमकर ,निलेश पाटील मोहन पाटील ,कमलाकर घरत भालचंद्र घरत

जयवंत पाटील ,सुनील काठे ,प्रतिष्ठित ,मान्यवर आदी उपस्थित होते.

अवश्य वाचा