हिंदुस्थानी पुराणात सात चिरंजीव मानले जातात त्यात विसाव्या शतकात आठव्या चिरंजीवाची भर पडली. त्या चिरंजीवाचे नाव आहे, "हिज ऍक्सलन्सी नेताजी सुभाषचंद्र बोस. "ते मृत्यू पावले नाहीत. तर वेळ व संधी पाहून ते परत येणार आहेत असे मानणाऱ्यांची संख्या आजही हिंदुस्थानात कमी नाही. त्याला कारणेही तशीच आहेत. एक तर ब्रिटिशांनी त्यांना वेळोवेळी मृत घोषित केले होते. तेव्हा ते जिवंत होते. अगदी अलीकडे फेब्रुवारी, २००५ साली तैवान सरकारने जाहीर केले कि, १८ ऑगस्ट ते २० सप्टेंबर १९४५ च्या सुमारास तैहोकू येथे कोणतेही विमान दुर्घटना घडली नाही आणि पुन्हा एकदा नेताजी चिरंजीव असल्याची पुष्टी मिळाली. इतके प्रेम आजही भारतीय नेताजींवर करतात. यावरून त्यांचा मोठेपणा सिद्ध होतो. मोतीलाल नेहरू यांनी आपला पुत्र जवाहरलाल नेहरू आणि सुभाष या दोघांची तुलना करताना म्हटले होते की, तू बॅरिस्टर तर तो आय. सी. एस. जवाहर तू दिसायला कोहिनूरसारखा तेज;पुंज तर सुभाष स्फटिकासारखा दिमाखदार! तुझ्यासाठी तरुण वर्ग पागल तर त्यांच्या हाकेला जीव द्यायला अनेक तरुण तयार. ऐन संघर्षामध्ये तू काहीसा गोंधळून जातोस तर तो पूर्णतः मशालीसारखा जळत उठतो. ही तुलना निश्चितच सुभाषचे श्रेठत्व दर्शवते. 

"बा. अदब हिज ऍक्सलन्सी  नेताजी  सुभाषचंद्र बोस, सुप्रीम कमांडर आझाद हिंद फौज, पंतप्रधान अर्जी हुकूमत ए-आझाद हिंद आ रहे हे, निगाहे रखो साहिबात" अशा ललकारीत त्यांच्या आगमनाची वर्दी सैन्याला दिली जायची. 

स्वातंत्र्याच्या इतिहासात भले त्यांना अव्वल स्थान नसेल तरी भारतीयांच्या अंतःकरणात त्यांना अव्वल स्थान मिळाले. ते अन्य कोणत्याही नेत्याला मिळाले  नाही. रंगूनच्या रेडिओवरून गांधींजीना राष्ट्रपिता संबोधून स्वातंत्र्य त्यांच्या चरणाशी आणून टाकेन असे उद्गार काढल्याने गांधीवाद्यांना ते गांधीवादी वाटतात. तर परदेशात जाऊन सशस्त्र क्रांतीचा लढा उभा राहावा असा सल्ला सावरकरांनी दिल्याने सावरकरवाद्यांना नेताजींचे विलक्षण आकर्षण तर त्यांची स्थापना केलेला "फॉरवर्ड ब्लॉक' हा डाव्या विचारसरणीचा असल्याचा कम्युनिस्टवाद्यांनाही ते आपले वाटतात आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मुस्लिमांचा बॅरिस्टर जिनइतकाच त्यांच्यावर विश्वास होता म्हणूनच की काय गांधीजींचा पाठिंबा नसतानाही पद्मश्री सीताराम यांच्या विरोधात ते काँग्रेस अध्यक्ष म्हणून निवडून आले. मुसलमानांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे. एकंदरीतच सुभाषचंद्र बोस म्हणजे भारतीय राजकारणातील एक अद्भुत असे गूढ व्यक्तीमत्व होते. त्यांचा जीवन वृत्तांत  असा-

२३ जानेवारी, १८९७ रोजी सुभाषचंद्रांचा जन्म झाला. त्यांचे पूर्वज बंगालच्या महिपदी म्हणजे राजाच्या पदरी युद्धमंत्री तसेच आरमाराच्या खात्यात प्रमुख होते. एकंदरीत लष्करी व आरमारी परंपरा त्यांच्या रक्तातच होती. त्याचे वडील वकील आणि बंगाल कायदेमंडळाचे सदस्य होते. रायबहाद्दूर हा सरकारी किताब त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात सोडून दिला होता. शुभाषबाबूंनी पदवी प्राप्त केल्यावर इंगलंडला जाऊन इंडियन सिव्हिल सर्व्हिस परीक्षेत उत्तीर्ण झाले. पण ब्रिटिशांची चाकरी मी करणार नाही, असे सभेत जाहीर केल्याने जनतेच्या गळ्यातील ते ताईत बनले. यानंतर चित्तरंजनदास यांना गुरु मानून त्यांनी राजकारणाचा श्रीगणेशा केला. चित्तरंजनदास कलकत्याचे महापौर बनल्यावर त्यांचे कार्यकारी अधिकारी म्हणून काम  केले. पण पुढे पुढे गांधीजींशी त्यांचे मतभेद इतके वाढले की, सुभाषबाबू काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यावर नेहरू  पटेल, आझाद यांनी काँग्रेसचा त्याग केला. "मी काँग्रेसचा चार आण्याचा सदस्य नाही," असे म्हणून गांधीजींनी पाठ फिरावली. सुभाषबाबू आजारपणात मरनाच्या दारात उभे होते. गांधीजींना कस्तुरबाजींकडे सांगूनही ते सुभाषला भेटायला आले नाहीत. अखेर काँग्रेस अध्यक्षपणाचा राजीनामा देऊन सुभाषबाबू बाहेर पडले व "फॉरवर्ड ब्लॉक" नावाचा नवा पक्ष स्थापन केला. 

इंग्रजीची अडचण हीच आपली संधी. शत्रूचा शत्रू तो आपला मित्र हे चाणक्यनीतीच सूत्र शुभाषबाबुंचे  राजकारण. ज्याप्रमाणे शिवाजी महाराज औरंजेबाच्या कैदेतून निसटले त्याप्रमाणे सुभाषबाबू इंग्रजांच्या नजरकैदेतून पसार इटली, जर्मनी आणि मग जपान त्यांनी गाठले. "आझाद हिंद फौज" उभारून "चलो दिल्ली" चा नारा दिला: हा सारा इतिहास भारतीयांना ठाऊकच आहे. पुढे जपानचा पराभव झाल्यावर त्यांना घेऊन जाणाऱ्या विमानाचा १८ ऑगस्ट, १९४५ रोजी अपघात होऊन ते ठार झाले. पण हे वास्तव तेव्हाही आणि आजही  भारतीय स्वीकारायला तयार नाहीत. त्यांचा मृत्यू हे अजूनही एक गूढच आहे. ऑक्टोबर  २००६ मध्ये एक १२५ वर्षाचा साधू मरण पावला. मृत्यूपूर्वी एक दिवस अगोदर त्याने मीच शुभाषचंद्र बोस आहे असे सांगून मृत्यूचे गूढ वाढवून ठेवले. तर जपान मध्ये रंकोजींच्या मंदिरात नेताजींच्या अस्थींचा कलश आहे असा दावा तेथील पुजारी करतात. या अस्थींची डी. एन. ए. चाचणी करून सरकराने नेताजींच्या मृत्यूचे गूढ उकलावे. 

सर्वसामान्य भारतीयांना वाटले, जर सुभाषबाबू असते तर फाळणी टाळली असती. तथापि शुभाषबाबुही मुस्लिम प्रश्नाकडे स्वप्नाळू वृत्तीने पाहत किंबहुना या बाबत ते गांधीजींपेक्षा एक पाऊल पुढेच होते. काँग्रेस कार्यकारणीचे सदस्य तर नेताजींना सवाई गांधी म्हणत. त्यांच्या अकाली निधनाने मात्र फाळणीचे गुन्हेगार होण्याचे दुर्भाग्य मग गांधी-नेहरूंच्या  माथी आले.

१८ ऑगस्ट इतर दिनविशेष 

१) १६९९- थोरले बाजीराव पेशवे, मराठा साम्राज्याचे पेशवे यांचा जन्म. 

२)१९९२- "पृथ्वी" क्षेपणास्त्राची आठवी चाचणी यशस्वी 

३)१९४५- सुभाषचंद्र बोस यांचे विमान अपघातात निधन 

४)१९६७- दलेर मेहंदी, भारतीय गायक, नर्तक यांचा जन्म. 

५) २०१६- रिओ ऑलिंपिकमध्ये साक्षी मलिकने कुस्तीत ब्रांझ पदक जिंकून इतिहास रचला. 

अवश्य वाचा