श्रीवर्धन 

श्रीवर्धन येथील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या गोखले महाविद्यालयाच्या विद्यार्थी व विद्यार्थिनी व श्रीवर्धन पोलिसांनी संयुक्तपणे श्रीवर्धन शहरामध्ये सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी मदत फेरीचे आयोजन आज सकाळी केले होते. यावर्षी संपूर्ण कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात देखील अतिवृष्टीने थैमान घातले, यामध्ये सर्वात जास्त महापुराचा फटका बसला सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांना, या ठिकाणची पुरी स्थिती अतिशय गंभीर होती 10 ते 12 फूट पाणी प्रत्येक ठिकाणी होते. घराचा तळमजला पाण्यामध्येच बुडालेला होता. या महापुरा मध्ये अनेक कुटुंबांना स्थलांतरित करावे लागले अनेकांना प्राण देखील गमवावे लागले तसेच गुरे ढोरे यांचेही अतोनात नुकसान झाले. या महापुरा मध्ये बाधित झालेल्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने  राज्याच्या मंत्रिमंडळाने मदत जाहीर केलेली असली तरीही, ती मदत तुटपुंजी पडू शकते. त्या ठिकाणच्या महापुरात जनतेला वाचवण्यासाठी भारतीय सैन्यदल तसेच एनडीआरएफच्या टीमला देखील बोलावण्यात आले होते, त्याचप्रमाणे विविध सामाजिक संस्थांनी व रिव्हर राफटींग करणाऱ्यांनी या महापुरा मध्ये मोलाचे मदत कार्य केले. या महापुरा मध्ये बाधित झालेल्यांना छोटासा खारीचा वाटा म्हणून श्रीवर्धन येथील गोखले महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी व श्रीवर्धन पोलिसांनी श्रीवर्धन शहरांमध्ये संयुक्त मदतफेरी काढून पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन नागरिकांना केले. त्यानुसार नागरिकांनीदेखील सढळ हस्ते मदत केली. सदर मदतफेरी गोखले महाविद्यालयआराठी, शिवाजी चौक, बागबान मशीद, स्वातंत्र्यवीर सावरकर चौक, आंबेडकर चौक येथुन शिवाजी चौकात समाप्त करण्यात आली.

अवश्य वाचा