उरण 

दिघोडे ते दास्तान फाटा हा ' एकेरी,  मार्ग अवजड वाहनांना शासनाच्या सन 2012 रोजीच्या,  'अध्यादेशानुसार प्रवेश बंदी' '  असताना देखील जड अवजड वाहने बेकायदेशीररित्या कायम चालू होती म्हणून अॅड. निग्रेश गजानन पाटील यांच्या नेतृत्वाखाली दिनांक.18/07/2019 रोजी दिघोडे येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात 'आला होता त्याअनुषंगाने 'सदरच्या एकेरी मार्गावरून 'दिनांक. 18/07/2019 रोजी पासून जड अवजड वाहने उरण 'वाहतूक विभागामार्फत बंद केली 'होती. परंतु त्वरीत दुसऱ्या 'दिवशी दिनांक.19/07/2019 रोजी पोलिस उपआयुक्त वाहतूक नवी मुंबई यांनी नवीन अधिसूचना काढून सन 2012 रोजीच्या अधिसूचनेत बदल करून सदर मार्ग जड अवजड वाहतुकीकरीता रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत मोकळा केला. तसेच दिवसा जड अवजड वाहतूक बंदी असताना देखील आजरोजी संध्या. 6 वाजल्यापासून ते सकाळी 11 पर्यंत अवजड वाहतूक चालूच असते.  त्यामुळे  स्थानिक ''जनतेमध्ये आक्रोश निर्माण झाला आहे. तसेच वरिष्ठ पोलिस निरीक्षक वाहतूक विभाग उरण ,श्री.माणिक नलावडे यांनी  दिनांक.10/08/2019 रोजी लेखी निमंत्रण पत्र देऊन  दिनांक.'13/08/2019 रोजी जे.एन.पी.टी.  मल्टिपर्पज हॉल येथे संध्या.4 वाजता उपस्थित राहण्यासाठी सांगितले असता 'अॅड. निग्रेश गजानन पाटील हे आपल्या शिष्टमंडळासोबत वरील नमूद ठिकाणावर हजर राहिले. ठरलेल्या वेळी व ठिकाणी मीटिंग 'चालू झाली उरण वाहतूक शाखेचे श्री.नलावडे यांनी प्रास्ताविक करून पुढे दास्तान फाटा ते दिघोडे ह्या मार्गावर असलेल्या सर्व कंटेनर व वेअरहाऊस 'मालकानं आपले मत मांडण्यास सांगितले असता त्यांनी प्रत्येकानी आपआपले मत मांडले त्यानंतर लॉरी मालक संघटनेचे अध्यक्ष बाळाराम पाटील यांनी आपले मत मांडले तसेच उपस्थित सर्व ग्रामपंचयतींच्या सरपंचांनी आपा आपले मत मांडले असता वरील सर्वांनी दास्तान फाटा ते दिघोडे ह्या मार्गावरून अवजड वाहनांची वाहतूक करण्यास परवानगी द्यावी अशी भूमिका घेतली त्यानंतर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक श्री.नलावडे यांनी अॅड.निग्रेश गजानन पाटील यांना आपले मत मांडण्यास सांगितले असता त्यांनी आपले मत मांडण्यास सुरुवात केली की शासनाने सन 2012 रोजी अधिसूचना काढून दास्तान फाटा ते दिघोडे हा मार्ग अवजड वाहतूकीस कायम प्रवेशबंदी घोषित केलेला होता व आहे त्याअनुषंगाने दिनांक.18/07/2019 रोजी दिघोडे येथे रास्ता रोको आंदोलन केले असता त्वरीत दुसऱ्या दिवशी म्हणजेच दिनांक.19/07/2019 रोजी शासनाने सन 2012 रोजीच्यां अधिसूचनेत बदल करून सदरचा मार्ग अवजड वाहनांना करीता रात्री 11 ते सकाळी 06 पर्यंत मोकळा केला. त्यामुळे सध्या तरी वरील अधीसुचनेनेचे पालन करणे गरजेचे आहे ह्या अँड .निग्रेश पाटील यांच्या मताचा मनात राग धरून आर्यन यार्डचे सुधाकर पाटील आणि लॉरी मालक संघटनेचे अध्यक्ष बाळाराम पाटील आणि दास्तान फाटा ते दिघोडे ह्या दरम्यान असणारे यार्ड मालक त्यामध्ये कोटक, क्रेस्टार, आबाद इंडीया, सिद्धिविनायक वेअर हाउस, श्री समर्थ वेअर हाउस, ह्या सर्व कंपनीचे मालक आणि कर्मचारी आणि रांजनपाडा गावाचे रमांकांत म्हात्रे व जासईचे माजी सरपंच हेमंत व चिरलेचे दलाल धोंडू पाटील हे अॅड. निग्रेश पाटील यांच्या अंगावर मारण्याच्या उद्देशाने धावून आले व शिवीगाळ करून जीवेठार मारण्याची धमकी दिली की, अँड. निग्रेश दास्तान ते दिघोडे हा मार्ग अवजड वाहतुकीकरीता मोकळा झाला नाही तर तुला सोडणार नाही अपघातामध्ये तुला जिवेठार मारून पुरावा ठेवणार नाही अशी धमकी देऊन मारण्याच्या उद्देशाने धावून आले.

त्यामुळे अॅड. निग्रेश पाटील यांनी न्हावा शेवा पोलिस स्टेशन येथे जाऊन वरील लोकांविरुद्ध कायदेशीर तक्रार दाखल केली असून पुढील कारवाई साठी लेखी तक्रार देखील दाखल केली असून पुढील तपास न्हावा शेवा पोलिस करीत आहेत.

अवश्य वाचा