नवी मुंबई

१ ऑगस्ट पासून श्रावण महिना सुरू झाला असून आता लवकरच बाप्पाचे आगमन होणार आहे.त्याचबरोबर श्रावणात मंगळागौर आणि गणेशोत्सवात पारंपारिक गाणी गाण्याची परंपरा आपल्या महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणात याला अनन्य महत्व आहे.आणि ही गाणी म्हणताना ढोलकी ची साथ ही लागतेच .मात्र याच ढोलकी व्यवसायला आज उतरती कला लागली आहे.आहे शहरी भागात या ढोलकीला ग्राहक मिळत नसल्याने या व्यवसायाला घर घर लागली आहे.

महाराष्ट्रात कुठलाही सण म्हटलं  की त्यात नाचगाणे हे आलेच .त्यात शिमगा असो की श्रावणातील मंगळागौर असो की गणेशोत्सव असो यात जर नाचगणे नसेल तर या सणाला काही मजा येत नाही. कोकणात आजही मंगळा गौर,गणेशोत्सव मोठ्या उत्सशाने साजरा करतात. रात्रभर घरी गाणी म्हणून .मात्र या नाचगाण्याना  साथ लागते ती ढोलकीची आणि आजही श्रावण महिन्यात  ढोलकी विक्रेते ढोलकी  विकत असताना दरोदार दिसत आहेत.मात्र वाढत्या धावपळीच्या दुनियेत डीजे आणि घरघुती इलेक्ट्रिक टेप ने आपली जागा व्यापल्याने  शहरी भागात असली नाचगाणी हवी तशी  होत नाही. या ढोलकी विक्रेत्यांना ग्राहक भेटणे मुश्किल झाले असुन त्यांच्या व्यवसायाला घर घर लागली आहे.

२००रुपयांपासून ते ७००रुवयांपर्यत ढोलकीचे दर आहेत.मात्र ग्राहक नसल्याने यातील बरेच व्यवसायिक आपला वाड वडिलांचा व्यवसाय असल्याने ते सांभाळून आहेत.मात्र नवीन व्यवसायिक या व्यवसायात उतरायचे नवा घेत नाही.कोकण परिसरात या ढोलकीला तुरळक मागणी असली तरी नवी मुंबई सारख्या शहारत ही ढोलकीला खप नसल्याचे व्यसायिक सांगतात.त्यामुळे आज जे काही हाताच्या बोटावर हे व्यवसायिक आहेत तेही ही आपला व्यवसाय बंद करण्याच्या मार्गावर आहेत.

सध्या शहरी भागात इलेक्ट्रॉनिक जमाना आल्याने पारंपारीक गाणी गाण्याची पद्धत  नामशेष होण्याच्या मार्गवर आहे.कोकणात  भागात ग्रामीण आजही ही कला जोपालसी जात आहे.ढोलकी विक्रीचा व्यवसाय आमच्या वाडवडिलांपासुन सुरू आहे.मात्र आज शहरी भागात या ढोलकी ला कोणी ग्राहक मिळत नसल्याने आम्हाला आमचा  व्यवसाय बंद करण्याची वेळ आली आहे.

अवश्य वाचा