नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे व तदनंतर महापुरामुळे कोकण प्रादेशिक विभागाअंतर्गत असलेल्या भांडुप, कल्याण , जळगांव, नाशिक परिमंडळ मध्ये मोठ्या प्रमाणात विद्युत यंत्रणा बाधित झाली व विद्दुत पुरवठा खंडित झाला. 

            कोकण प्रादेशिक विभागांतर्गत सिंधुदुर्ग , रत्नागिरी , रायगड , पालघर , ठाणे , मुंबई उपनगर हे जिल्हे असून नाशिक विभागीय मंडळांअंतर्गत नाशिक, धुळे, जळगांव, अहमदनगर आणि नंदुरबार अशा एकूण १२ जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात विद्युत उपकरणाचे नुकसान झाले आहे. 

१) HT Pole - या क्षेत्रातले उच्चदाब वाहिनीचे एकूण २२२६ (HT Pole) खांब कोसळले असून त्यापैकी १६०० खांब उभे करण्यात आलेले आहेत. 

२) LT Pole- लघुदाब वाहिनीचे ६२३९ (LT Pole) खांब कोसळले असून ४३३० खांब उभे करण्यात आलेले आहेत 

३) HT Lines - उच्चदाब वाहिनी १८२.१६ किमी तुटलेली असून त्यापैकी १५६.४५ किमी वाहिन्यांचे काम दुरुस्ती करण्यात आली आहे. 

४) LT Lines - लघुदाब वाहिन्या ह्या ४६३.४२ किमी तुटलेल्या असून त्यापैकी ४०६. ५६ किमी लाईन चे काम पूर्ण करण्यात आलेले आहे. 

५) D P Collapse - एकूण १२५ रॊहित्र कोसळले असून त्यापैकी  ८७ रॊहित्र  हे पुन्हा उभा करण्यात आलेले आहेत.

६) DTC Failures - एकूण ७९८ रोहित्र नादुरुस्त झालेले असून त्यातील ७१२ रोहित्र हे बदलण्यात आलेले आहेत .

७) Consumers - या कालावधीत ७,५१,९१२ ग्राहक विद्युत पुरवठा बाधित झालेले असून त्यापैकी ७,४१,०४४ विद्युत धारकांचा पुरवठा पूर्ववत झाला आहे. त्यानंतर अद्यापही उर्वरीत विद्युत पुरवठा अद्यावत करण्याचे काम सुरु आहे. 

८) विशेष कामगिरी सोबतच्या यादीप्रमाणे 

            अतिवृष्टीच्या या कालावधीमध्ये झालेल्या नुकसानीची माहिती संबंधित जिल्हाधिकारी यांना मंडळ स्तरावर पाठवण्यात आली आहे. 

            महावितरण अंतर्गत या सर्व बाबींचा आढावा काल दि. १३/०८/२०१९ रोजी ऊर्जा खात्याचे मंत्री मा.ना.श्री. चंद्रशेखर बावनकुळे तसेच अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक मा. श्री. संजीवकुमार यांनी VC  द्वारे घेतलेला आहे. उर्वरित काम वेळेत पूर्ण करण्याची सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिलेली आहे. 

            महावितरण अंतर्गत या नंतरही असलेल्या अडचणी जनतेने संबंधित अधीक्षक अभियंता व त्यांच्या अधिपत्याखालील असलेल्या इतर अधिकारी व कर्मचारी यांच्या निदर्शनास आणून दिल्यास त्याबाबत त्वरित कार्यवाही करण्यात येईल असे प्रतिपादन सह व्यवस्थापकीय संचालक वि. ना. काळम, कोकण प्रादेशिक संचालक यांनी केले आहे. 

अवश्य वाचा